Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॅलरी अकाऊंट विषयी महत्त्वाची गोष्ट, दर महिन्याला पगार जमा न झाल्यास काय होणार? वाचा…

सॅलरी खात्यात पगार जमा होणं बंद झाल्यास काय होतं हे तुम्हाला माहिती आहे?

सॅलरी अकाऊंट विषयी महत्त्वाची गोष्ट, दर महिन्याला पगार जमा न झाल्यास काय होणार? वाचा...
Cash-
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 5:31 AM

Salary Account Latest News मुंबई : तुम्ही सरकारी नोकरी करत असाल किंवा खासगी, तुमच्याकडे सॅलरी अकाऊंट असणारच. इतरवेळी तुम्ही बँकेत खातं सुरू करायला गेलात तर तुमच्या खात्यावर एक विशिष्ट रक्कम कमीत कमी शिल्लक असावी लागते. मात्र, सॅलरी अकाऊंटबाबत तशी अट नसते. या खात्यातून तुम्ही सर्वच्या सर्व रक्कमही काढू शकता. याशिवाय या सॅलरी अकाऊंटवर जास्तीची मर्यादा असलेले क्रेडिट कार्डची ऑफरही मिळते. त्यामुळे अनेकांना फायदा होता. मात्र, याच सॅलरी खात्यात पगार जमा होणं बंद झाल्यास काय होतं हे तुम्हाला माहिती आहे? (Know what happened with Salary account after inactive for 3 months )

टीव्ही 9 ची सहयोगी वेबसाईट Money 9 च्या एका अहवालानुसार, सलग 3 महिन्यांपर्यंत सॅलरी खात्यात पगार जमा न झाल्यास हे अकाऊंट सेव्हिंग म्हणजेच बचत खात्यात रुपांतरीत होतं. त्यामुळे सॅलरी अकाऊंटचे सर्व बेनेफिट बंद होऊन सेव्हिंग अकाऊंटचे नियम लागू होतात. त्यामुळे अशा खात्यात कमीत कमी रक्कम ठेवण्याचा नियमही लागू होतो. तुमच्या परवानगीशिवाय बँकेला हे खातं बंद करण्याची परवानगी नसते. असं असलं तरी विशिष्ट काळ या खात्यावर काही व्यवहार झाले नाही तर बँक हे खातं फ्रिज करते.

किती काळ व्यवहार न झाल्यास काय होतं?

जर तुम्ही 2 वर्षांपर्यंत संबंधित बँक खात्यावर कोणताही व्यवहार केला नाही, तर ते खातं डॉरमेंट किंवा इनऑपरेटिव्ह म्हणून घोषित केलं जातं. त्यानंतर हे फ्रीज केलेलं बँक खातं पुन्हा सुरु करण्यासाठी खातेधारकाला काही दंडात्मक रक्कमही भरावी लागू शकते. अशी परिस्थिती ओढावू नये म्हणून काही उपाययोजनाही करता येतात.

खातं फ्रिज होऊ नये म्हणून काय करावं?

सलग 3 महिने पगार आला नाही तर तुमचं सॅलरी खातं सेव्हिंगमध्ये रुपांतरीत होतं. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी जमा रकमेपासून तर अकाऊंट मेंटेनन्स चार्ज, डेबिट कार्ड, इंटर-ब्रँच कॅश डिपॉजिट चार्ज, SMS अलर्ट चार्ज, चेक बुक चार्ज असे अनेक चार्ज द्यावे लागतात.

असं होऊ नये म्हणून तुम्ही नोकरी बदलल्यास नव्या कार्यालयात जुन्या खात्याचेच तपशील देऊन ते वापरणं अधिक योग्य. जर तसं करणं शक्य नसेल तर जुनं खातं बंद करुन नवं सुरू करणं जास्त योग्य राहतं.

हेही वाचा :

Video: ब्रेकिंग न्यूज सांगताना पत्रकार थांबला, लाईव्ह टीव्हीवर म्हणाला ‘पगार मिळत नाहीये, आम्हीही माणसंच’

… मग आता ‘वर्क फ्रॉम होम’मुळे तुमच्या पगारावरही परिणाम होणार?

Salary Overdraft: गरज पडल्यास काही मिनिटात पैसे मिळणार, या उपयोगी सुविधेचे नियम आणि अटी काय?

व्हिडीओ पाहा :

Know what happened with Salary account after inactive for 3 months

'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले.
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना.
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप.
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप.
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण.
'ते चु*** आहेत चु***', राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका
'ते चु*** आहेत चु***', राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका.