HEALTH INSURANCE: तुमचा क्लेम रिजेक्ट झालायं? चिंता सोडा, जाणून घ्या-नेमकं काय करावं?
विमा क्षेत्रातील जाणकारांच्या मते इन्श्युरन्स क्लेम नाकारल्यानंतर सर्वप्रथम क्लेम नाकारण्याच्या (Claim Rejection) पत्राची प्रतीक्षा करायला हवी. विमा कंपनीच्या माध्यमातून पत्र ग्राहकांना दिलं जातं.
नवी दिल्लीः तुमचा हेल्थ इन्श्युरन्सचा क्लेम रिजेक्ट झाला आहे का? तुम्हाला पैशांची तातडीनं गरज असताना क्लेम नाकारल्यामुळे आर्थिक संकट निर्माण झालं असेल. हेल्थ इन्श्युरन्स (Health Insurance) क्लेम नाकारल्यानंतर नेमकं काय कराव? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. विमा क्षेत्रातील जाणकारांच्या मते इन्श्युरन्स क्लेम नाकारल्यानंतर सर्वप्रथम क्लेम नाकारण्याच्या (Claim Rejection) पत्राची प्रतीक्षा करायला हवी. विमा कंपनीच्या माध्यमातून पत्र ग्राहकांना दिलं जातं. क्लेम नाकारण्याच्या पत्रात सर्व कारणं नमूद केलेली असतात. ‘इन्श्युरन्स समाधान’चे सर्वेसर्वा शैलेश कुमार यांनी ग्राहकांना क्लेम नाकारण्याच्या स्थितीत नेमकं काय करावं याविषयी महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. ग्राहकांना सर्वप्रथम लेटर ऑफ रिजेक्शनची (नकाराचं पत्र) (Letter of Rejection) प्रतीक्षा करायला हवी. क्लेम नाकारण्याचं मूळ कारण पत्रात नमूद केलेलं असतं. तसेच क्लेम पूर्तता करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची देखील विचारणा केली जाऊ शकते.
क्लेम रिजेक्ट होण्याची प्रमुख कारणे:
क्लेम नाकारण्याचं महत्वाचं कारण म्हणजे विमा घेतावेळी ग्राहकांना नमूद केलेली आरोग्याची स्थिती. क्लेम घेतेवेळी ग्राहक कोणत्याही आजाराचा उल्लेख करत नाही. त्यामुळे कंपनीकडून आजार लपविल्याचा ठपका ठेवला जातो. अशा स्थितीत ग्राहकांकडून तक्रार नोंदविण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक नसतो. ग्राहकाला सर्वप्रथम विमा कंपनीकडे तक्रार नोंदवावी लागेल. तक्रारीत विमा व आजारासंबंधित सर्व तथ्ये नमूद करायला हवी. तुमचा क्लेम 30 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास नोडल अधिकाऱ्याकडे तक्रार केली जाते. नोडल अधिकाऱ्यांच्या सुनावणीवेळी समाधान न झाल्यास लोकपालकडे तक्रार नोंदविली जाऊ शकते.
तक्रार कुठे नोंदवायची?
तुमचा इन्श्युरन्स क्लेम 30 लाख रुपयांहून अधिक असल्यास ग्राहक लवादाकडे तक्रार नोंदणी केली डाऊ शकते. याहून कमी रकमेचा क्लेम असल्यास विमा लोकपालकडे तक्रार करावी लागेल. पॉलिसी खरेदीवेळी ग्राहकाला कोणत्याही आजाराने ग्रासलेले नसते. मात्र, पॉलिसी खरेदीनंतर आजारानं ग्रस्त झाल्यास कव्हर विषयी अनेकांच्या मनात साशंकता असते. पॉलिसी सुरु झाल्याच्या दिवशीचा वैद्यकीय अहवाल सादर करायला हवा. त्यानंतर क्लेम साठी अहवालाचा फायदा होईल.
इन्श्युरन्स क्लेम नाकारणे टाळण्यासाठी सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचन करायला हवं. सही करावयाच्या प्रत्येक अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचावे. तुमच्या सर्व आरोग्य विषयक माहितीची सतत्या नमूद करणं अत्यंत महत्वपूर्ण आहे.