Income Tax : या करदात्यांना ITR Form-1 ची गरज, तुम्ही चुकीचा अर्ज तर भरत नाहीत ना?

Income Tax : करदात्यांना आता आयटीआर फाईल करण्याची घाई झाली आहे. पण आयटीआर भरताना सतत काळजी घ्यावी लागते. नाहीतर एक चूक पण तुम्हाला भारी पडू शकते. त्यामुळेच ITR Form-1 फाईल करताना काळजी घ्यावी लागते.

Income Tax : या करदात्यांना ITR Form-1 ची गरज, तुम्ही चुकीचा अर्ज तर भरत नाहीत ना?
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 7:23 PM

नवी दिल्ली : जुलै महिना सुरु झाला आहे. 31 जुलै 2023 रोजी आयकर रिटर्न फाईलिंग करण्याची अंतिम मुदत आहे. म्हणजे आता करदात्यांकडे (Taxpayers) फार कमी कालावधी उरला आहे. शेवटच्या दिवसात वेबसाईट हँग होण्याचे, सर्व्हर डाऊन होण्याचे प्रकार गेल्यावर्षी आपण अनुभवले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आयटीआर भरणे आवश्यक आहे. पण करदात्यांनी आयटीआर फाईल करण्याची नसती घाई करु नये. आयटीआर भरताना सतत काळजी घ्यावी लागते. त्यामुळेच ITR Form-1 फाईल करताना काळजी घ्यावी लागते. नाहीतर एक चूक पण तुम्हाला भारी पडू शकते.

आयटीआर फॉर्म 1 आयटीआर फॉर्म 1 हा सर्वाधिक वापरण्यात येणारा अर्ज आहे. सर्वसाधारणपणे नोकरदार वर्ग या फॉर्मचा कर भरणा करण्यासाठी वापर करतो. आयकर विभागानुसार, आयटीआर फॉर्म 1 हा सर्वात सोपा फॉर्म आहे. त्याचा वापर नोकरदार वर्ग करतो.

या सर्वांसाठी हाच फॉर्म भारतातील सर्वसाधारण करदात्याकडून आयटीआर फॉर्म 1 दाखल करण्यात येतो. हा फॉर्म अनेक लोकांसाठी उपयोगी पडतो. ज्यांचे उत्पन्नाचा स्त्रोत पगार, लाभांश, बँकेतील व्याज, घर, मालमत्ता अथवा शेतीतून वार्षिक 5000 रुपयांपेक्षा नाही. त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे. वार्षिक 50 लाख रुपयांपर्यंत पगारातून उत्पन्न कमाविणारे नोकरदारांना हा फॉर्म आहे.

हे सुद्धा वाचा

कोण नाही भरु शकत

  • जर करदात्यांची कर पात्र उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर आयटीआर फॉर्म 1 नाही भरु शकत. NRI आयटीआर फॉर्म 1 फाईल करु शकत नाही
  • जी व्यक्ती म्युच्युअल फंड, सोने, इक्विटी शेअर, घरातील संपत्ती, इतर स्त्रोतातून कमाी होत असेल तर ती व्यक्ती आयटीआर फॉर्म 1 भरु शकत नाही
  • जर एखादी व्यक्ती सट्टा, जुगार, लॉटरी, अथवा इतर अशा खेळातून फायदा होत असेल तर आयटीआर फॉर्म 1 फाईल करता येणार नाही
  • ज्या व्यक्तींकडे एकापेक्षा अधिक संपत्ती, घर असेल तर आयटीआर फॉर्म 1 भरता येणार नाही. अनिवासी भारतीयांना पण आयटीआर फॉर्म 1 भरता येणार नाही

टीडीएसचा नियम याशिवाय बँकेतून रोख रक्कम काढताना कलम 194 एन अंतर्गत टीडीएस शुल्क आकारण्यात येत असेल तर तुम्हाला ITR-1 भरता येणार नाही. हिंदू अविभक्त कुटुंबे (HUFs) ITR-1 फाईल करु शकत नाही.

आयटीआर-1 फाईल केल्यास फटका जर एखाद्याने चुकून आयटीआर-1 फाईल केल्यास काय होईल. अशा परिस्थितीत तुम्हाला आयकर खात्याकडून नोटीस येऊ शकते. नोटीस आल्यानंतर तुम्हाला 15 दिवसांच्या आत सुधारीत आयटीआर दाखल करावे लागेल. तुम्ही सुधारीत आयटीआर दाखल न केल्यास, दाखल आयटीआर अमान्य करण्यात येईल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.