बँक देत नाही क्रेडिट कार्ड नंबर, मग कोण जारी करतं? जाणून घ्या प्रत्येक क्रमांकाचा अर्थ

क्रेडिट कार्ड क्रमांकामध्ये प्रामुख्याने 3 घटक असतात. पहिल्या घटकामध्ये तुमच्या खात्याची माहिती असते. दुसऱ्यामध्ये कार्ड जारी करणाऱ्या संस्थेविषयी माहिती आहे. तिसरा घटक चेकसमचा असतो.

बँक देत नाही क्रेडिट कार्ड नंबर, मग कोण जारी करतं? जाणून घ्या प्रत्येक क्रमांकाचा अर्थ
बँक देत नाही क्रेडिट कार्ड नंबर, मग कोण जारी करतं? जाणून घ्या प्रत्येक क्रमांकाचा अर्थ
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 7:43 AM

नवी दिल्ली : आजकाल क्रेडिट वापरणे ही सामान्य बाब आहे. आपल्या कार्डवर एक नंबर लिहिलेला असतो. या आकड्यांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला वाटेल की बँका फक्त कार्डवर नंबर टाकतात. पण ते तसे नाही. क्रेडिट कार्डवर लिहिलेल्या प्रत्येक क्रमांकाचा एक विशेष अर्थ आहे, जो बँकेने जारी करीत नाही, तर तो आंतरराष्ट्रीय मानक संघटनेने (ISO) दिलेला असतो. (Know who issues credit card, know the meaning of each number)

आम्ही दररोज आमची क्रेडिट कार्ड वापरतो. ऑनलाईन शॉपिंग असो किंवा किराणा मालाची खरेदी, चित्रपटाची तिकिटे किंवा पेट्रोल पंपाची बिले भरणे, आम्ही क्रेडिट कार्डचा वापर निर्विवादपणे करतो. पण कधी त्यावर छापलेल्या क्रमांकाचा विचार केला आहे का, तो काय आहे आणि का दिला जातो? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे आकडे असेच छापलेले नसतात, तर त्यांना एक विशेष अर्थ आहे. तुमचा क्रेडिट कार्ड नंबर तुमची बरीच माहिती त्याच्या रेकॉर्डमध्ये ठेवतो. हे तुम्हाला फसवणूक आणि पेमेंट त्रुटींपासून वाचवते.

आंतरराष्ट्रीय मानक

याला इंग्रजीत ISO किंवा आंतरराष्ट्रीय मानक संस्था(International Standard Organisation) म्हणतात. तुमचा क्रेडिट कार्ड क्रमांक फक्त ISO द्वारे जारी केला जातो. ही अशी संस्था आहे जी क्रेडिट कार्डसाठी मानक ठरवते. आयएसओ देशाच्या विविध राष्ट्रीय मानक संस्थांच्या संपर्कात आहे. दोन्ही प्रकारच्या संस्था क्रेडिट कार्डच्या संख्येवर एकत्र काम करतात. क्रेडिट कार्डचा आकार, नंबरची जागा आणि कार्डची सामग्री आयएसओद्वारे ठरवली जाते. हे मानक संपूर्ण जगाचे मानके लक्षात घेऊन सेट केले जाते.

क्रेडिट कार्ड क्रमांक

क्रेडिट कार्ड क्रमांकामध्ये प्रामुख्याने 3 घटक असतात. पहिल्या घटकामध्ये तुमच्या खात्याची माहिती असते. दुसऱ्यामध्ये कार्ड जारी करणाऱ्या संस्थेविषयी माहिती आहे. तिसरा घटक चेकसमचा असतो.

नंबर जारीकर्त्याची माहिती

याला इश्यूअर इन्फॉर्मेशन म्हणतात ज्यात उद्योग क्रमांक आणि जारीकर्ता ओळख क्रमांक असतो. तुमच्या क्रेडिट कार्डवरील पहिला क्रमांक ‘मेजर इंडस्ट्री आयडेंटिफायर’ किंवा MII चा असतो. हा क्रमांक कार्ड जारी करणाऱ्या संस्थेची ओळख दर्शवितो. पहिल्या क्रमांकानंतर पुढील 5 अंक एकत्र जोडले जातात, नंतर तो जारीकर्ता ओळख क्रमांक म्हणजेच IIN म्हणून ओळखला जातो. हे सहा क्रमांक तुम्ही वापरत असलेले कार्डचे प्रकार दर्शवतात. या क्रमांकाच्या आधारे व्यापारी पैसे घेतात. उदाहरणार्थ, प्रवास आणि करमणूक कार्ड 3 क्रमांकापासून सुरू होतात तर बँकिंग आणि आर्थिक कार्ड 5 क्रमांकापासून सुरू होतात.

तुमची माहिती

क्रेडिट कार्डच्या पहिल्या 6 क्रमांकानंतर आणि एक शेवटचा क्रमांक वगळता मध्ये जी संख्या असते हा तुमचा खाते क्रमांक असतो. प्रत्येक खातेदारासाठी एक विशिष्ट क्रमांक आहे, जो खातेधारकाची ओळख पटवतो. क्रेडिट कार्डच्या शेवटच्या क्रमांकाला चेकर अंक म्हणतात किंवा त्याला चेकसम असेही म्हणतात. हे तुमच्या कार्डची वैधता दर्शवते. ही संख्या ल्युटन फॉर्म्युला नावाच्या विशेष अल्गोरिदम अंतर्गत बनवली आहे. पेमेंटमधील त्रुटी शोधण्यासाठी चेकसमचा वापर केला जातो. या क्रमांकाद्वारे फ्रॉड पेमेंट रोखता येतो. (Know who issues credit card, know the meaning of each number)

इतर बातम्या

Tesla लवकरच स्वस्तातली इलेक्ट्रिक कार लाँच करणार, फीचर्सही दमदार

मोबाईलच्या नादात शिक्षकाने जीव गमावला, चंद्रपूरच्या मूल शहरातील धक्कादायक घटना

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.