Income Tax Return : कोणासाठी आहे ITR-1, यांना तर बिलकूल नाही अधिकार

Income Tax Return : ITR-1 कोणासाठी आहे, त्यासाठी काय प्रक्रिया, कोणते कागदपत्रं लागू शकतात, याची माहिती असणे गरजेचे आहे. हा फॉर्म प्रत्येकासाठी महत्वाचा नाही, मग कोणासाठी महत्वाचा आहे?

Income Tax Return : कोणासाठी आहे ITR-1, यांना तर बिलकूल नाही अधिकार
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 5:03 PM

नवी दिल्ली : प्राप्तिकर रिटर्न फॉर्म (Income Tax Return) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 रोजी आहे. त्यानंतर आयटीआर दंडासह भरता येईल. आईटीआर-1 अंतर्गत वेतन आणि एकल व्यक्तीला आयटीआर भरण्याची परवानगी देण्यात येते. प्राप्तिकर खात्याचा हा सर्वात सोपा आणि सरळ अर्ज असल्याचे मानल्या जाते. यामध्ये इतर फॉर्मच्या तुलनेत अधिक माहिती भरण्याची गरज नाही. प्राप्तिकर विभागाने 25 एप्रिल 2023 रोजी आयटीआर फॉर्म 1 आणि 4 साठी ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिले आहे. तुम्ही संकेतस्थळावरुन ते डाऊनलोड करुन घेऊ शकता. पण गोष्ट महत्वाची आहे की, सर्वच वेतनधारकाला ITR-1 फॉर्म दाखल करावा लागत नाही. हा फॉर्म प्रत्येकासाठी महत्वाचा नाही, मग कोणासाठी महत्वाचा आहे?

कोण करु शकते आयटीआर-1 चा उपयोग भारतीय नागरिकाला आयटीआर-1 फॉर्म भरता येतो. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 50 लाख रुपयांपेक्षा त्याचे उत्पन्न कमी असेल. पगार, पेन्शन आणि कुटुंब पेन्शनमधून उत्पन्न होत असेल, घराच्या संपत्तीतून उत्पन्न होत असेल आणि 5000 रुपयांपर्यंत शेतीतून उत्पन्न असेल. याशिवाय पोस्ट ऑफिसचे व्याज, उत्पन्न आणि लाभांशमधून मिळकत होत असेल तर त्या व्यक्तीला आयटीआर-1 अर्ज भरता येतो.

कोण नाही भरु शकत आयटीआर-1 जर एखाद्या व्यक्तीने म्युच्यु्अल फंड, सोने, इक्विटी शेअर, संपत्ती आणि इतर स्त्रोतातून उत्पन्न मिळवत असेल तर ती व्यक्ती आयटीआर-1 अर्ज भरु शकत नाही. याव्यतिरिक्त जर एखादी व्यक्ती लॉटरी, हॉर्स रायडिंग अथवा तत्सम उत्पन्नातून लाभ होत असेल तर ती व्यक्ती आयटीआर-1 दाखल करु शकत नाही.

हे सुद्धा वाचा

ITR-1 ही व्यक्ती पण नाही भरु शकत जर एखाद्या व्यक्तीला एकाहून अधिक घराच्या संपत्तीतून उत्पन्न होत असेल तर ती व्यक्ती आयटीआर-1 दाखल करु शकत नाही. अनिवासी भारतीय नागरिकाला हा अर्ज भरता येणार नाही. याशिवाय बँकेतून रोख रक्कम काढताना कलम 194 एन अंतर्गत टीडीएस शुल्क आकारण्यात येत असेल तर तुम्हाला ITR-1 भरता येणार नाही. हिंदू अविभक्त कुटुंबे (HUFs) ITR-1 फाईल करु शकत नाही.

चुकून आयटीआर-1 फाईल केल्यास काय होईल जर एखाद्याने चुकून आयटीआर-1 फाईल केल्यास काय होईल. अशा परिस्थितीत तुम्हाला आयकर खात्याकडून नोटीस येऊ शकते. नोटीस आल्यानंतर तुम्हाला 15 दिवसांच्या आत सुधारीत आयटीआर दाखल करावे लागेल. तुम्ही सुधारीत आयटीआर दाखल न केल्यास, दाखल आयटीआर अमान्य करण्यात येईल.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.