नवी दिल्ली: अलीकडच्या काळात भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांविषयीची चर्चा आणि कुतूहल वाढताना दिसत आहे. आतापर्यंत केवळ चर्चेचा भाग असलेली इलेक्ट्रिक वाहने प्रत्यक्षात रस्त्यांवर धावतानाही दिसत आहेत. आगामी चार-पाच वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहने सर्रासपणे रस्त्यावर धावताना दिसल्यास कोणालाही आश्चर्य वाटणार नाही.
यादृष्टीने इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपन्यांनी आता बाजारपेठेच्या मागण्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. कोमाकी या कंपनीने जेष्ठ व्यक्ती आणि दिव्यांगाच्या गरजा लक्षात घेऊन खास इलेक्ट्रिक स्कुटर तयार केली आहे. Komaki XGT X5 या स्कुटरमध्ये मेकॅनिकल पार्किंगसह इतर अनेक सुविधा आहेत. या स्कुटरची दोन मॉडेल्स लाँच करण्यात आली आहेत. यापैकी XGT-X5- (72V24AH) या मॉडेलची किंमत 90,500 रुपये तर XGT-X5 GEL या मॉडेलची किंमत 72,500 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
आतापर्यंत कोमाकी कंपनीने विशेषत: दिव्यांगांसाठी तयार करण्यात आलेल्या XGT X5 या मॉडेल्सच्या 1000 स्कुटर्सची विक्री केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कुटर भारतीय बाजारपेठेतही विक्रीसाठी सज्ज आहे. कंपनीच्या अधिकृत केंद्रांवर या स्कुटरची विक्री करण्यात येईल. याशिवाय, तुम्ही कोमाकीची इलेक्ट्रिक स्कुटर ऑनलाईन पद्धतीनेही बुक करू शकता. मात्र, स्कुटरचा ताबा घेण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या नजीकच्या डिलरशी संपर्क साधावा लागेल. कोमाकी इलेक्ट्रिक स्कुटर तुम्ही ईएमआयवरही खरेदी करु शकता.
कोमाकी इलेक्ट्रिक स्कुटर ही लाल आणि ग्रे या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही स्कुटर एकदा चार्ज केल्यानंतर 80 ते 90 किलोमीटर अंतर कापू शकते. या स्कुटरमध्ये VRLA जेल बॅटरी आणि लिथियम आयन बॅटरी आहेत. याशिवाय, एक्स्टेंशनसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम उपलब्ध आहे.
संबंधित बातम्या:
टाटाच्या इलेक्ट्रिक कारचा टीझर रिलीज, जाणून घ्या काय आहेत फीचर
PHOTO | ऑगस्टमध्ये या 5 कारला सर्वाधिक मागणी, घरी आणण्यासाठी बराच काळ करावी लागेल प्रतीक्षा
Hero Motocorp ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सादर, कंपनीकडून टीझर VIDEO शेअर