‘या’ बँकेत फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरात बदल, जाणून घ्या आता किती परतावा मिळणार?

Fixed Deposit scheme | अलीकडच्या काळात अनेक बँकाकडून मुदत ठेव योजनांच्या दरात बदल करण्यात आले आहेत. भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेने आपल्या मुदत ठेवींचे व्याजदर बदलले आहेत.

'या' बँकेत फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरात बदल, जाणून घ्या आता किती परतावा मिळणार?
फिक्स्ड डिपॉझिट
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 7:28 AM

नवी दिल्ली: भारतीय गुंतवणूकदारांमध्ये बँकेतील मुदत ठेव योजनांचा (Fixed Deposite Scheme) पर्याय नेहमीच लोकप्रिय राहिला आहे. कमी जोखमीची आणि हमखास परतावा देणारी गुंतवणूक म्हणून फिक्स्ड डिपॉझिटकडे पाहिले जाते. त्यामुळे आजही गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असूनही सामान्य गुंतवणूकदार फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देतात.

अलीकडच्या काळात अनेक बँकाकडून मुदत ठेव योजनांच्या दरात बदल करण्यात आले आहेत. भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेने आपल्या मुदत ठेवींचे व्याजदर बदलले आहेत. नवीन दर 8 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. चला कोटक महिंद्रा बँकेचे नवीन व्याज दर पाहू.

कोटक महिंद्रा बँकेचे नवे व्याजदर

2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी, 7 ते 30 दिवसांमध्ये मुदत संपणाऱ्या ठेवींवर 2.5 टक्के आणि 31 ते 90 दिवसांमध्ये मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर 2.75 टक्के व्याज मिळेल. याशिवाय, 91-120 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के व्याज दर मिळेल, तर 121-179 दिवसांच्या मुदत ठेव योजनेवर 3.25 टक्के व्याज दर मिळेल.

तर 180-269 दिवसांच्या एफडीवर 4.25 टक्के व्याज मिळेल. 270-364 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवरील व्याजदर 4.4 टक्के इतका आहे. 365-389 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4.5 टक्के व्याज दर आहे तर 390 दिवसांच्या एफडीवर 4.75 टक्के व्याज दर असेल.

ज्येष्ठ नागरिकांना विशेष लाभ

कोटक महिंद्रा बँकेच्या मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर आणखी जास्त आहेत. 7 ते 14 दिवसांच्या एफडीसाठी 3 टक्के इतका व्याजदर आहे. तर 180 दिवसांची मुदत असणाऱ्या योजनेसाठी 4.75 टक्के इतके व्याज मिळेल. 364 दिवसांच्या मुदत ठेव योजनेत पैसे गुंतवल्यास ज्येष्ठ नागरिकांना 4.9 टक्के इतके व्याज मिळेल.

या तीन बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळतेय सर्वाधिक व्याज

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank FD rates )

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून सात ते दहा दिवसांच्या मुदत ठेव योजनेसाठी 3.25 टक्के ते 6.75 टक्के इतके व्याज दिले जात आहे.

नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बँक (North East Small Finance Bank FD rates)

नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बँकेकडून सात ते दहा दिवसांच्या मुदत ठेव योजनेसाठी 3 ते 7 टक्के इतके व्याज दिले जात आहे.

जन स्मॉल फायनान्स बँक (Jana Small Finance Bank FD rates)

जन स्मॉल फायनान्स बँकेकडून मुदत ठेव योजनांसाठी 2.5 टक्के ते 6.75 टक्के इतके व्याज दिले जात आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेतील (Utkarsh Small Finance Bank) व्याजदर 3 टक्के ते 6.75 टक्के इतका आहे.

संंबंधित बातम्या:

आता गुगलही बँकांप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु करणार; एका वर्षासाठी किती व्याज मिळणार?

सप्टेंबर महिन्यात ‘या’ 5 बँकांच्या FD मधल्या गुंतवणुकीवर दुप्पट फायदा, जाणून घ्या सर्वकाही

या तीन बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळतेय सर्वाधिक व्याज

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.