Multibagger Stock: पेटीएम, झोमॅटो, एलआयसीकडून निराशा; मात्र ‘या’ आयपीओमुळे गुंतवणूकदार मालामाल, वर्षभरात लाखाचे सहा लाख

गेले आर्थिक वर्ष हे आयपीओचे वर्ष म्हणून ओळखले गेले. गेल्या वर्षी अनेक कंपन्यांनी आपले आयपीओ बाजारात दाखल केले मात्र त्यातील अनेक कंपन्यांकडून गुंतवणूकदारांची निराशा झाली. परंतु अशी देखील एक कंपनी आहे, जीने गुंतवणूकदारांना वर्षभरात 470 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

Multibagger Stock: पेटीएम, झोमॅटो, एलआयसीकडून निराशा; मात्र 'या' आयपीओमुळे गुंतवणूकदार मालामाल, वर्षभरात लाखाचे सहा लाख
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 12:46 PM

मुंबई : गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जगातील सर्वच शेअर मार्केट (Share Market) हे आपल्या पीक पॉईंटवर होते. मात्र त्यानंतर विक्रीचा दबाव वाढल्याने मोठी घसरण पहायला मिळाली. गेल्या वर्षी ज्या कंपन्यांनी आपले आयपीओ (IPO) आनले त्यांची अवस्था तर अत्यंत वाईट झाली आहे. भारतीय शेअर मार्केटबाबत बोलयाचे झाल्यास पेटीएम, झोमॅटो आणि एलआयसीच्या आयपीओने (LIC IPO) गुंतवणूदारांची निराशा केली आहे. या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत कोट्यवधीचा फटका बसला आहे. यापुढेही या शेअरमध्ये तेजी येण्याची शक्यता कमी आहे. मात्र या सर्व कंपन्यांकडून गुंतवणूकदारांची निराशा झाली असतानाच असा देखील एक आयपीओ आहे, ज्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. आज आपन त्या आयपीओबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

वर्षभरात 470 टक्क्यांचा परतावा

हा आयपीओ आहे ‘एसएमई’ कंपनी असलेल्या Kotyark Industries Ltd चा या कंपनीने गेल्या वर्षी सात ऑक्टोबर रोजी आपला आयपीओ शेअर बाजारात दाखल केला होता. या कंपनीचे शेअर्स 2 नोव्हेंबर रोजी सूचीबद्ध झाले. कंपनीने आपल्या आयपीओसाठी अप्पर प्राइस बँड 51 रुपये एवढा निश्चित केला होता. गेल्या आठवड्यात शुक्रवारी दहा जून रोजी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 291 रुपयांवर पोहोचले आहे. अशाप्रकारे कंपनीने गेल्या सात महिन्यांत ग्राहकांना 470 टक्के परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे ग्राहक मालामाल झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

…तर आज मिळाला असता 5.80 लाखांचा परतावा

आता गुंतवणुकीच्या हिशोबाने आपण या कंपनीच्या शेअरर्सचा विचार करुयात. समजा तुम्ही जर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुम्हाला तब्बल 5.80 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता. पहिल्याच दिवशी शेअर सूचीबद्ध झाल्यानंतर कंपनीचे शेअर इश्यू प्राईसच्या खाली घसरले होते. शेअर पहिल्याच दिवशी 48.45 रुपयांवर पोहोचले मात्र त्यानंतर या कंपनीचे शेअर घसरणीतून सावरले. वर्षभरापेक्षा कमी कालावधीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुतंवणूकदारांना तब्बल 470 टक्के परतावा दिला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.