Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डीमॅट खात्यांसाठी केवायसी करण्याची मुदत वाढली, ‘सेबी’चा ग्राहकांना मोठा दिलासा

तुम्ही देखील शेअरबाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांसाठीच्या केवायसीला मुदतवाढ मिळाली आहे. सिक्योरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीने (Sebi)डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांसाठीच्या केवायसीची (KYC) मुदत वाढवली आहे.

डीमॅट खात्यांसाठी केवायसी करण्याची मुदत वाढली, 'सेबी'चा ग्राहकांना मोठा दिलासा
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 9:50 AM

तुम्ही देखील शेअरबाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांसाठीच्या केवायसीला मुदतवाढ मिळाली आहे. सिक्योरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीने (Sebi)डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांसाठीच्या केवायसीची (KYC) मुदत वाढवली आहे. सेबीच्या नव्या निर्णयानुसार डीमॅट खातेधारकांना आता 30 जून, 2022 पर्यंत केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. जर तुम्ही देखील तुमच्या डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे केवायसी केले नसेल तर तुमच्याजवळ आता 30 जून, 2022 पर्यंतचा वेळ आहे. या काळात तुम्ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता. डिमॅट खात्याची केवायसी करण्यासाठी 31 मार्च 2022 पर्यंतची तारीख देण्यात आली होती. मात्र आता मुदतवाढ मिळाल्याने खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

…तर खाते होणार निष्क्रिय

गुंतवणुकीमधील आणि इतर गैरव्यवहार टाळण्यासाठी सिक्योरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीकडून डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याची केवायसी पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले होते. त्यासाठी 31 मार्च 2022 पर्यंतची तारीख देण्यात आली होती. या कालावधीत केवायसी प्रक्रिया जर पूर्ण झाली नाही तर तुमचे खाते निष्क्रिय होईल असे सांगण्यात आले होते. कारवाई टाळण्यासाठी स्टॉक ब्रोकर्सकडून आपल्या ग्राहकांना केवायसी पूर्ण करण्यासाठी एसएमएस पाठवायला देखील सुरुवात झाली होती. मात्र आता केवायसीला मुदतवाढ मिळाल्याने डिमॅट खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

KYC पूर्ण केले नाही तर काय होऊ शकते?

सिक्योरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर तुमच्या खात्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचे खाते निष्क्रिय होऊ शकते. म्हणजे तुम्हाला त्या खात्यातून कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. तुमच्या संबंधित खात्यावरील जुने पोर्टफोलियो तसेच राहातील मात्र तुम्ही नव्याने कोणत्याही शेअरची खरेदी अथवा विक्री करू शकणार नाहीत. केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचा इनकम प्रूफ या डॉक्युमेंटची प्रामुख्याने आवश्यकता आहे.

संबंधित बातम्या

Today’s gold, silver prices: सोन्याच्या दरात तेजी, चांदीही वधारली; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

इंधन दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरूच ठेवणार; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे स्पष्टीकरण

Emergency in SriLanka: श्रीलंकेत नागरिक रस्त्यावर, आंदोलनाला हिंसक वळण; सरकारकडून आणीबाणीची घोषणा

'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न.
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने.
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.