LIC FD Scheme : एक लाखांच्या गुंतवणुकीवर 35 हजारांचा फायदा; गुंतवणुकीवर 6 टक्के व्याजाने परतावा
एलआयसी मुदत ठेव योजनेत एक वर्षांकरिता जमा रक्कमेवर गुंतवणुकदारांना 5.15 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.4 टक्के व्याज मिळते. 1 वर्ष 5 महिने आणि 30 दिवसांच्या मुदत ठेवीवर सर्वसामान्य गुंतवणुकदाराला 5.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.75 टक्के व्याजाने परतावा मिळत आहे.
लआयसीच्या मुदत ठेव योजनेत (FD Scheme) गुंतवणुकदारांना चांगली कमाई होत आहे. सध्याच्या मुदत ठेवीवरील व्याजदराचा विचार करता गुंतवणुकदारांसाठी ही चांगली संधी आहे. ही संधी भारतीय आयुर्विमा महामंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. एक ते पाच वर्षांदरम्यान केलेल्या मुदत ठेवीतील गुंतवणुकीवर ग्राहकांना चांगला परतावा मिळेल. एलआयसीच्या मुदत ठेव योजनेत (LIC Fixed Deposit) गुंतवणुकदारांना 5.9 टक्क्यांच्या व्याजदराने परतावा मिळत आहे. जर एखादी व्यक्ती 5 वर्षांसाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक करत असेल तर त्याचा कालावधी (Maturity) पूर्ण झाल्यानंतर 1,34,885 रुपये मिळतात. यााच अर्थ त्याला सरळसरळ 35 हजारांचा फायदा होतो. जर एवढीच रक्कम तीन वर्षांसाठी गुंतवली तर 5.9 टक्के व्याजदराने मुदत ठेवीवर 1 लाख 34 हजार 216 रुपये मिळतात. या योजनेत एक ते पाच वर्षांचा कालावधी निवडता येतो. चला तर जाणून घेऊयात या मुदत ठेव योजनेविषयी…
मुदत ठेव योजना
एलआयसीच्या मुदत ठेव योजनेत एक वर्षाकरिता जमा रक्कमेवर सामान्य गुंतवणुकदाराला 5.15 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकाला 5.4 टक्के व्याज मिळते. 1 वर्ष 5 महिने आणि 30 दिवसांच्या कालावधीसाठीच्या मुदत ठेवीवर 5.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.75 टक्के व्याज मिळते. 1 वर्ष 11 महिने 28 दिवसांच्या मुदत ठेवीवर गुंतवणुकदाराला 5.65 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.9 टक्के व्याज मिळते. 2 वर्ष 11 महिने 27 दिवसांच्या मुदत ठेवीवर गुंतवणुकदाराला 5.9 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 6.15 टक्के व्याज मिळते. याच पद्धतीने 4 वर्षे 11 महिने 27 दिवसांच्या कालावधीसाठीच्या मुदत ठेवीवर 6.15 टक्के व्याज मिळते. तर 4 वर्षे 11 महिने 27 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वसामान्य व्याजदर 6 टक्के आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच व्याजदर 6.25 टक्के आहे.
किती व्याजदर मिळते?
एलआयसी हाऊसिंग फायनान्स च्या मुदत ठेवीवर एफडीवरील व्याजदर सर्वसामान्यपणे 5.15 ते 6 टक्क्यांपर्यंत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 5.4 ते 6.25 टक्क्यांपर्यंत आहे. या योजनेत जास्तीत जास्त 20 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. एखादा ग्राहक 50 हजार रुपये गुंतवणूक करत असेल तर त्याला 3 वर्षांकरीता 5.9 टक्क्यांप्रमाणे 59,656 रुपये मिळतील. तर 5 वर्षांकरीता 6 टक्के व्याजदराने जमा रक्कमेवर कालावधी पूर्ण झाल्यानंतर 67,443 रुपये मिळतील.
इतर बँकांमधून मिळणारे व्याज
इतर बँकांचा विचार करता कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक मुदत ठेवीवर 6-6.5 टक्के, कर्नाटका बँक मुदत ठेवीवर 5.4-5.8 टक्के, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक मुदत ठेवीवर 7-7.3 टक्के, आर्यावर्त बँक एफडीवर 5.05-5.55 टक्के , आंध्र प्रगती ग्रामीण बँक एफडीवर 5.7 टक्के, करुर वैश्य बँक एफडीवर 5.5-6 टक्के, पंजाब अँड सिंध बँक एफडीवर 5.3-5.8 टक्के व्याज देते.
इतर बातम्या