LIC IPO : केंद्राचा एक बाण, तीन निशाणे, एलआयसीचा आयपीओ दृष्टीपथात, विमाधारकांसाठी 10 टक्के शेअर राखीव

एलआयसीचा आयपीओ आल्यानंतर भांडवलाच्या आधारे बाजारात देशातील सर्वात मोठी कंपनी असेल. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज दुसऱ्या क्रमांकावर असेल आयपीओसंदर्भात सेबीला सादर केलेल्या कागदपत्रांनुसार सरकार 31 कोटी इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून आपला 5 टक्के हिस्सा विकणार आहे.

LIC IPO : केंद्राचा एक बाण, तीन निशाणे, एलआयसीचा आयपीओ दृष्टीपथात, विमाधारकांसाठी 10 टक्के शेअर राखीव
LIC (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 4:08 PM

LIC IPO : देशातील गुंतवणुकदार आतुरतेने वाट पाहत असलेल्या एलआयसी आयपीओचा मुहूर्त अगदी हाकेच्या अंतरावर आला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. मार्च महिन्यांत, हे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच एलआयसीचा आयपीओ आणण्याची तयारी सरकार करत आहे. एलआयसी आयपीओचा मसुदा (DRHP) सरकारने रविवारी सायंकाळी उशिरा बाजार नियामक प्राधिकरण सेबीकडे सादर केला. मसुद्यानुसार, एलआयसीचे एकूण 632 कोटी शेअर्स (Share) असतील, त्यापैकी सुमारे 31.6 कोटी शेअर्स आयपीओद्वारे विकले जातील. सेबीकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावित माहितीपत्रकानुसार, जीवन विमाधारकांचा आयपीओ खरेदीचा दावा आणखी मजबूत होणार आहे. ज्या गुंतवणुकदारांकडे आधीपासूनच एलआयसीची पॉलिसी (LIC) आहे, अशांसाठी या आयपीओमध्ये 10 टक्के शेअर्स राखीव ठेवण्यात येणार आहेत. म्हणजेच अशा विमाधारकांना आयपीओमध्ये गुंतवणुकीची अधिक संधी उपलब्ध झाली आहे. एलआयसीचा आयपीओ आल्यानंतर भांडवलाच्या आधारे बाजारात देशातील सर्वात मोठी कंपनी असेल. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज दुसऱ्या क्रमांकावर असेल आयपीओसंदर्भात सेबीला सादर केलेल्या कागदपत्रांनुसार सरकार 31 कोटी इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून आपला 5 टक्के हिस्सा विकणार आहे.

एलआयसीच्या आयपीओसाठी रेड हेअरड्रेसिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा दाखल करण्यात आला आहे, असे ट्विट गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (DIPAM) सचिव तुहीन कांता पांडे यांनी केले आहे. डीआरएचपी हा मसुदा पेपर आहे जो आयपीओ आणण्यापूर्वी कंपनीच्या वतीने सेबीकडे सादर केला जातो. कंपनीच्या संपूर्ण तपशीलाव्यतिरिक्त आयपीओच्या माध्यमातून किती शेअर्स किंवा शेअर्सची विक्री होईल आणि आयपीओमधून जमा होणारा पैसा कंपनी कुठे वापरणार हे सांगितलं जातं.

देशातील या सर्वात मोठ्या आयपीओसाठी सरकारने पॉलिसीधारकांसाठीही हिस्सा राखून ठेवला आहे. एलआयसीच्या आयपीओमधील 10 टक्के हिस्सा पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. सामान्य गुंतवणूकदारांनाही आयपीओमध्ये शेअरच्या किंमतीत 5 टक्के सूट मिळू शकते, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत पॉलिसीधारकांना आयपीओचा उत्साह पाहायला मिळू शकतो. त्याचप्रमाणे अँकर गुंतवणूकदारांनाही आयपीओमध्ये हिस्सा राखून ठेवण्यात आला आहे.

एलआयसी हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा विमा ब्रँड

भारतात एलआयसीच्या सुमारे 290 दशलक्ष पॉलिसी आहेत, अनेकजणांकडे एकापेक्षा जास्त पॉलिसी आहेत. अशा स्थितीत पॉलिसीधारकांची एकूण संख्या 20 ते 25 कोटींच्या दरम्यान असू शकते, असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत या प्रचंड आयपीओमुळे बाजारात गुंतवणुकदारांची संख्या झपाट्याने वाढेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

3.16 कोटी शेअर्स राखीव

मसुद्यानुसार, या आयपीओमध्ये एलआयसीच्या विमाधारकांसाठी स्वतंत्र हिस्सा ठेवण्यात आला आहे. एलआयसीच्या विमाधारकांसाठी 10 टक्के म्हणजे सुमारे 3.16 कोटी शेअर्स राखीव ठेवण्याचा प्रस्ताव या मसुद्यात आहे. या आयपीओमध्ये एलआयसीच्या विमाधारकांसाठी शेअर्स राखीव ठेवण्यात येणार असल्याचे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (DIPAM) सचिव तुहीन कांत पांडे यांनी नुकतेच सांगितले होते.

ठळक मुद्दे

  1. एलआयसी पॉलिसीधारकांना ह्या निर्णयाचा फायदा होणार
  2. सरकारसाठी निर्गुंतवणुकीच्या दृष्टीने आयपीओ खास आहे.
  3. 31 मार्चपूर्वी जगातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक असलेली एलआयसी बाजारात सुचीबद्ध होईल

सेबीने 3 आठवड्यात मागितली मंजुरी

सरकारसाठी निर्गुंतवणुकीच्या दृष्टीने हा आयपीओ खूप खास आहे. त्यामुळेच 31 मार्चपूर्वी हा आयपीओ बाजारात यावा यासाठी सरकार मसलत आणि कसरत करत आहे.यावर्षी अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी एलआयसी आयपीओ साठीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगितले होते. त्यानुसार, या 31 मार्चपूर्वी जगातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक असलेली एलआयसी बाजारात सुचीबद्ध होईल.1956 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या एलआयसीच्या शेअर्सच्या अधिग्रहणासाठी सरकारला प्रति शेअर 16 पैसा खर्च येणार असल्याची माहिती सेबीकडे दाखल माहितीपत्रकात देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

LIC IPO : विमाधारकांसाठी खूषखबर; आयपीओसाठी दावा मजबूत

भारतातील सर्वात मोठा आयपीओ; केंद्र एलआयसीतील 5 टक्के समभागांची विक्री करणार

एलआयसीचा ‘जीवन लाभ’: 260 रुपयांची गुंतवणूक, 20 लाखांचा परतावा!

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.