Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC IPO: आयपीओचं काऊंटडाउन सुरू, पॉलिसीधारकांना खास सवलत; ड्राफ्ट फायनल?

एलआयसीकडून लवकरच ड्राफ्ट रेडी हिअरिंग प्रॉस्पेक्ट (DRHP) सादर केले जाणार आहे. मार्च अखेरपर्यंत एलआयसी आयपीओ सूचीबद्ध (लिस्टेड) करण्याचे उद्दिष्ट असल्याची चर्चा आहे.

LIC IPO: आयपीओचं काऊंटडाउन सुरू, पॉलिसीधारकांना खास सवलत; ड्राफ्ट फायनल?
आता किराणा दुकानांतून सहजपणे एलआयसी आयपीओत करा गुंतवणूकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 9:08 PM

नवी दिल्लीः भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या आयपीओच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एलआयसीच्या बहुप्रतीक्षित आयपीओत पॉलिसीधारकांना विशेष सवलत दिली जाणार आहे. ईटी नाऊच्या वृत्तानुसार, आयपीओमध्ये पॉलिसीधारकांना 5 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. तसेच रिटेल बोलीधारकांना आणि कर्मचाऱ्यांना प्राईस बँडवर (PRICE BAND) काही सवलत मिळण्याची अपेक्षा आहे. एलआयसीचा आयपीओ कधी दाखल होणार याकडं अर्थजगताचं लक्ष लागलं आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआईसी) इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) विवरण पुस्तिका अंतिम टप्प्यात आहे. एलआयसीकडून लवकरच ड्राफ्ट रेडी हिअरिंग प्रॉस्पेक्ट (DRHP) सादर केले जाणार आहे. मार्च अखेरपर्यंत एलआयसी आयपीओ सूचीबद्ध (लिस्टेड) करण्याचे उद्दिष्ट असल्याची चर्चा आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात 1.75 लाख कोटी रुपये निर्गृंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आयपीओचं विक्रमी पाऊल:

इश्य प्राईसवर एलआयसी मार्केट कॅपमध्ये देशातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये सहज समाविष्ट होऊ शकेल. लिस्टिंगनंतर एलआयसीची कामगिरी दमदार राहिली तर विमा कंपनीची दादागिरी आयपीओ आणि शेअर बाजारात ही चालेल. कंपनी आयआयएल आणि टीसीएलही मागे टाकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 1.75 लाख कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

केंद्राचं आयपीओसाठी सर्वकाही:

केंद्र सरकारने सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या आयपीओसाठी मोठी पावलं उचलली आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत 10 मर्चंट बँकरची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये गोल्डमॅन सॅक्स, सिटी ग्रूप आणि नोमुरा यांचा समावेश आहे. कायदेशीर सल्लागार म्हणून सिरिल अमरचंद मंगलदास यांची नियुक्ती केली होती. एलआयसीचा आयपीओ या आर्थिक वर्षात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. एलआयसीच्या आयपीओ कधी येऊन धडकणार याची घोषणा अर्थसंकल्पात होण्याची दाट शक्यता आहे.

आयपीओ म्हणजे काय रं भाऊ?

आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक आॕफर. मार्केटमध्ये पैसे गोळा/उभारण्याचा मार्ग आहे. कंपनीला पैशाची आवश्यकता असते. तेव्हा शेअर बाजारपेठेत लिस्ट केले जातात. आयपीओ द्वारे मिळणारी रक्कम कंपनी स्वतःच्या निर्णयानुसार खर्च करतात. या रकमेचा वापर कंपनी लोन भरण्यासाठी किंवा कंपनीच्या फायद्यासाठी वापरली जाऊ शकते. स्टॉक एक्स्चेंज वर शेअर्स लिस्टिंगमुळे कंपनीला आपल्या शेअरला योग्य किंमत मिळविण्यासाठी मदत होते.

संबंधित बातम्या

GOLD LOAN: कोणत्या बँकेकडून सर्वात कमी दरात गोल्ड लोन? प्रक्रिया शुल्कासह व्याजदर जाणून घ्या

योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आहेत सभावती शुक्ला, गोरखपूर लढत या कारणासाठी असणार लक्षवेधी, चर्चेतील चेहऱ्यांचा मतदार संघ

Video | ‘गाडी के पायदान’ आणि फलाटामधील अंतरावर लक्ष द्या! लक्ष न देण्याऱ्यांचं काय होतं? बघा CCTV

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.