मुलीच्या भविष्यासाठी एलआयसीची खास योजना; दिवसाला 125 रुपये गुंतवा आणि लग्नावेळी मिळवा 27 लाख
LIC Policy | पॉलिसीत फिक्स्ड इनकम आणि तुमची मुद्दल सुरक्षित राहण्याची हमी असते. तुम्ही दररोज 125 रुपयांच्या हिशेबाने गुंतवणूक केली तर तुम्हाला 27 लाख रुपये मिळतात. या योजनेचा कालावधी 25 वर्षांचा आहे. मात्र, तुम्हाला फक्त 22 वर्षापर्यंत प्रीमियम भरावा लागतो.
मुंबई: गेल्या दोन वर्षात कोरोना संकटामुळे प्रचंड अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशावेळी पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्याविषयी चिंता वाटणे साहजिक आहे. विशेषत: मुलींचे लग्न ही पालकांसाठी खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे या सगळ्याच्यादृष्टीने आर्थिक नियोजन कसे करावे, या विचारात बरेच पालक असतात.
अशा पालकांसाठी एलआयसीची जीवन लक्ष्य ही पॉलिसी चांगला पर्याय ठरू शकेल. या पॉलिसीत फिक्स्ड इनकम आणि तुमची मुद्दल सुरक्षित राहण्याची हमी असते. तुम्ही दररोज 125 रुपयांच्या हिशेबाने गुंतवणूक केली तर तुम्हाला 27 लाख रुपये मिळतात. या योजनेचा कालावधी 25 वर्षांचा आहे. मात्र, तुम्हाला फक्त 22 वर्षापर्यंत प्रीमियम भरावा लागतो.
जीवन लक्ष्य पॉलिसी घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना पुढील हप्ते भरावे लागत नाहीत. तसेच मुलीसाठी काढलेल्या या पॉलिसीतून दरवर्षी 10 टक्के रक्कम कुटुंबीयांना दिली जाते. तुम्ही मासिक, सहामाही किंवा वार्षिक पद्धतीने या योजनेचा प्रीमियम भरू शकता.
18 ते 50 वयोगटातील व्यक्ती ही पॉलिसी घेऊ शकते. मॅक्सिमम मॅच्युरिटीचे वय 65 इतके आहे. या पॉलिसीत तुम्हाला accidental death and disability benefit rider आणि new term assurance rider असे दोन रायडर मिळतात.
मॅच्युरिटी बेनिफिटबाबत बोलायचे झाले तर संबंधित व्यक्तीला सम अश्योर्डसह सिंपल रिविजनरी बोनसही मिळतो. याशिवाय, अतिरिक्त बोनसचाही लाभ मिळतो. तसेच तुम्हाला करातूनही सूट मिळते.
या पॉलिसिची मिनिमम सम अश्योर्ड एक लाख रुपये इतकी आहे. एखाद्याने 30 वर्षांसाठी 10 लाखांच्या सम अश्योर्डसह पॉलिसी घेतली तर संबंधित व्यक्तीला महिन्याला 3800 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल. त्यानंतर 25 वर्षांनी तुम्हाला 27 लाख रुपये मिळतील.