LIC ची भन्नाट पॉलिसी, दर दिवसाला 60 रुपयांची बचत करा, 6 लाख रुपये मिळवा
ज्यांना फार कमी कालावधीत प्रीमियम भरायचा आहे आणि काही वर्षांनी त्यांना मॅच्योरिटीची रक्कम हवी आहे, अशा व्यक्तींसाठी ही खास योजना आहे.
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमने (Life Insurance Corporation Of India) आपल्या करोडो ग्राहकांसाठी नवनवीन योजना सुरु करत असते. नुकतंच एलआयसीने लिमिटेड प्रीमियम एनडॉमेंट योजना सुरु केली आहे. ज्यांना फार कमी कालावधीत प्रीमियम भरायचा आहे आणि काही वर्षांनी त्यांना मॅच्योरिटीची रक्कम हवी आहे, अशा व्यक्तींसाठी ही खास योजना आहे. या व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन एलआयसीने हे धोरण तयार केले आहे. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला केवळ 8 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागतो. तसेच या पॉलिसीची मुदत जरी 16 किंवा 32 वर्षे असेल पण तुम्हाला प्रीमियम हा फक्त 8 वर्षांसाठी भरावा लागतो. (LIC Limited Premium Endowment Plan Check benefits and other details of this policy)
लिमिटेड प्रीमियम एंडोमेंट योजना ही एक पूर्ण प्रॉफीट देणारी योजना आहे. यात तुम्हाला दोन प्रकारच्या सुविधा मिळतात. यातील पहिली सुविधा म्हणजे व्हेस्टेड सिंपल रिव्हर्झनरी बोनस आणि दुसरी म्हणजे फायनल अॅडिशनल बोनस. ही पॉलिसी तुम्हाला 12, 16 आणि 21 अशा तीन वर्षांसाठी घेण्यात येते. याचे प्रीमियम तुम्हाला केवळ 8-9 वर्षांसाठी भरावे लागते.
वयोमर्यादा काय?
या योजनेत प्रीमियम भरण्याच्या मुदतीसाठी तुम्हाला 8 ते 9 वर्षांच्या दरम्यान एक पर्याय निवडावा लागतो. त्यानुसार प्रीमियम भरण्याची परवानगी मिळते. ही योजना कमीत कमी 18 वर्ष वय असलेली व्यक्ती घेऊ शकते. या पॉलिसीच्या मुदतीनुसार त्याची वयोमर्यादा आहे. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तींना 12 वर्षांसाठी पॉलिसी घेतली तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा काही वेगळी असेल. तसेच 16 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी ही मर्यादा काही वेगळी असेल. ही पॉलिसी केवळ 59 वर्षांच्या वयापर्यंत घेता येऊ शकते.
कमीत कमी 3 लाख रुपयांची पॉलिसी घेणे गरजेचे
यात तुम्हाला कमीत कमी 3 लाख रुपयांची पॉलिसी घ्यावी लागेल. त्यापेक्षा कमी किंमतीची योजना नाही. या पॉलिसीमध्ये सम अॅश्युअर्ड रकमेवर कोणतीही कमाल मर्यादा नाही. या पॉलिसीचे वार्षिक प्रीमियम तुम्ही अर्धवार्षिक, त्रैमासिक किंवा प्रत्येक महिन्याला पैसे देऊ शकता. या पॉलिसीमध्ये कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे.
म्हणजेच समजा उदाहरणार्थ एका 35 वर्षांच्या प्रभूने 3 लाख रुपयांच्या रकमेची पॉलिसी 21 वर्षांसाठी घेतली आणि त्याच्या प्रीमियमची मुदत 9 वर्षे ठेवली तर त्याला 9 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. यानुसार प्रभूला दरमहिना 1,890 रुपये प्रीमियम भरावा लागेल म्हणजेच त्याला दर दिवसाला 60 रुपये जमा करावे लागतील. तर हेच प्रीमियम वार्षिक 22,705 रुपये इतके आहे. अशा प्रकारे संपूर्ण प्रीमियम दरम्यान प्रभूला 2,00,433 रुपये द्यावे लागतील.
मॅच्युरिटीनंतर किती रक्कम मिळणार?
यानुसार जेव्हा या पॉलिसीला 21 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा ती मॅच्युर होईल. या मॅच्युरिटीनंतर प्रभूला विमा राशीचे 3 लाख रुपये, व्हेस्टेड सिंपल रिव्हर्झनरी बोनसच्या 3,15,000 रुपये तर अंतिम अतिरिक्त बोनस म्हणून 30,000 रुपये मिळतील. अशाप्रकारे, प्रभुला मॅच्युरिटीनंतर एकूण 6,15,000 रुपये मिळतील.
गुरुवारच्या दिवशी ही 4 कामं नक्की करा, यशाच्या मार्गात येणारे अडथळे होतील दूरhttps://t.co/NBr6mfkIhs#thursdaymorning #thursdayastrotips #LordVishnu
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 8, 2021
(LIC Limited Premium Endowment Plan Check benefits and other details of this policy)
संबंधित बातम्या :
EPF की PPF यातच अडकलात! रिटायरमेंटसाठी ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, 60 वर्षानंतर मिळतील 3.5 कोटी
Income Tax Rules | मुलांच्या नावे भविष्यकालीन गुंतवणूक, कर सवलत मिळणार का? नियम काय?
विमा पॉलिसीमध्ये ‘बेनेफिशियल नॉमिनी’चा नवा नियम; याच व्यक्तींना मिळू शकतील नॉमिनीचे लाभ