LIC स्वस्तात मस्त पॉलिसी: 28 रुपयांची बचत, 2 लाखांचा लाभ; जाणून घ्या फायदे

पॉलिसीमध्ये मृत्यू लाभही समाविष्ट आहेत. पॉलिसी घेतल्यानंतर 5 वर्षांच्या कालावधीच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनी व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतील. जर 5 वर्षानंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनी व्यक्तीला विमा रकमेसह लॉयल्टी रक्कमही अदा केली जाईल.

LIC स्वस्तात मस्त पॉलिसी: 28 रुपयांची बचत, 2 लाखांचा लाभ; जाणून घ्या फायदे
Insurance Policy
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 9:41 PM

नवी दिल्ली : सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय म्हणून भारतीय आयुर्विमा महामंडळाला सर्वसामान्यांची पसंती असते. निम्न उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी एलआयसीच्या गुंतवणूक योजना हितकारक ठरतात. कमी हफ्त्यांत अधिक परतावा देणाऱ्या योजना म्हणून एलआयसीच्या पॉलिसी ओळखल्या जातात. एलआयसीच्या एका पॉलिसीद्वारे 2 लाखांच्या कव्हरसह प्रति दिवस 28 रुपयांची बचत करुन मॅच्युरिटी वेळी 2.3 लाखांचा परतावा मिळू शकतो.

एलआयसीच्या या पॉलिसीची एकाधिक वैशिष्ट्ये आहेत

o पॉलिसीसाठी जीएसटी शुल्क अदा करावे लागत नाही o लघू बचत पॉलिसीच्या हफ्त्यात घट होते o पॉलिसीचे अन्य वैशिष्ट्य म्हणजे ऑटो-कव्हर मानले जाते. तीन वर्षापर्यंत सुरळीत हफ्ते अदा केल्यानंतर काही कारणास्तव हफ्ते थकल्यास विशिष्ट कालावधीसाठी संपूर्ण विमा रकमेवर कव्हरेज प्राप्त होते. o पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नसते. अन्य पॉलिसीसाठी वैद्यकीय चाचणी अनिवार्य ठरते. त्यानुसार पॉलिसीचे कव्हरेज निश्चित केले जाते. o पॉलिसीचे अन्य वैशिष्ट्य म्हणजे लॉयल्टीची रकमेची भर. पॉलिसी मॅच्युरिटीनंतर विमा रकमेसोबत लॉयल्टी रक्कम विमा धारकाला प्रदान केली जाते. o एलआयसीची सर्वात स्वस्त पॉलिसी मानली जाते. केवळ 28 रुपयांच्या बचतीवर 2 लाखांहून अधिक रकमेचा फायदा होतो.

मॅच्युरिटीचं गणित?

पॉलिसीचे लाभ सोप्या भाषेत समजावून घेऊया. विमाधारकाने 2 लाखांची मायक्रो सेव्हिंग पॉलिसी घेतली आहे. पॉलिसीचा कालावधी 15 वर्षांचा आहे. पॉलिसीसाठी नियमित हफ्ता भरणे आवश्यक आहे. विमाधारकाला 15 वर्षे पॉलिसीचे प्रीमियम अदा करावे लागेल. विमाधारकाने प्रति महिना हफ्ता भरण्याचे निश्चित केले असल्यास त्यांना महिन्याला 863 याप्रमाणे दिवसाला 28 रुपये अदा करावे लागतील. वार्षिक हफ्ताचा विचारात घेतल्यास 9,831 रुपये अदा करावे लागतील. विमाधारकाला संपूर्ण पॉलिसी कालावधीसाठी 1,47,465 रुपये भरावे लागतील. पॉलिसीचा कालवधी संपल्यानंतर विमाधारकाला एकूण विमा रक्कम 2 लाख आणि 30 हजारांच्या लॉयल्टी रकमेची भर त्यामध्ये पडेल. विमाधारकाला मॅच्युरिटीनंतर एकूण 2 लाख 30 हजार रुपये प्राप्त होतील.

मृत्यू लाभ

पॉलिसीमध्ये मृत्यू लाभही समाविष्ट आहेत. पॉलिसी घेतल्यानंतर 5 वर्षांच्या कालावधीच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनी व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतील. जर 5 वर्षानंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनी व्यक्तीला विमा रकमेसह लॉयल्टी रक्कमही अदा केली जाईल.

इतर बातम्या

Digital Payment | भारतीयांचा रेकॉर्डब्रेक UPI वापर, 4 वर्षात 70 पटींनी वाढले डिजिटल पेमेंट!

Home Loan | होमलोन दुसऱ्या बँकेत स्विच करायचंय? केव्हा आणि कधी करावं? जाणून घ्या, फायदे!

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.