म्हातारपणाची चिंता सोडा, LIC च्या योजनेत पैसे गुंतवा आणि महिन्याला मिळवा 9 हजारांची पेन्शन
LIC Scheme | जर तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर तुम्हाला त्यासाठी आतापासूनच तयारी करावी लागेल. आतापासूनच तुम्ही एकरकमी गुंतवणूक केल्यास तुम्हाला उतारवयात दरमहा पेन्शन मिळेल.
मुंबई: आयुष्यातील उतारवयात निवृत्ती वेतन हा ज्येष्ठांसाठी प्रमुख आर्थिक आधार मानला जातो. मात्र, खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनची (Pension) सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे म्हातारपणी पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी खासगी कंपन्यांमधील एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करु शकतात.
जर तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर तुम्हाला त्यासाठी आतापासूनच तयारी करावी लागेल. आतापासूनच तुम्ही एकरकमी गुंतवणूक केल्यास तुम्हाला उतारवयात दरमहा पेन्शन मिळेल. त्यासाठी एलआयसीची न्यू जीवन शांती ही योजना अत्यंत योग्य पर्याय आहे. ही एलआयसीची जुनी योजना आहे, परंतु 25 ऑगस्ट 2020 रोजी काही बदलांसह नवीन स्वरूपात सादर करण्यात आली. ही एक पेन्शन योजना आहे ज्यात पेन्शनच्या चार पद्धती उपलब्ध आहेत – वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक आणि मासिक.
किमान 1000 रुपयांची पेन्शन
योजनेची किमान खरेदी किंमत 1.5 लाख रुपये आहे. किमान मासिक पेन्शन 1000 रुपये, त्रैमासिक पेन्शन 3000 रुपये, अर्धवार्षिक पेन्शन 6000 रुपये आणि वार्षिक पेन्शन 12000 रुपये आहे. यापेक्षा कमी पेन्शनसाठी ही पॉलिसी खरेदी करू शकत नाही. या योजनेसाठी किमान प्रवेश वय 30 वर्षे आणि कमाल प्रवेश वय 79 वर्षे आहे.
या योजनेअंतर्गत पॉलिसी खरेदी केल्यानंतर पुढील वर्षापासून पेन्शन सुरू होऊ शकते. पेन्शन किमान 31 वर्षांपासून सुरू होईल आणि जास्तीत जास्त 80 वर्षांच्या वयात ही पेन्शन मिळण्याची सुविधा देखील आहे.
वारसदारालाही पेन्शन मिळण्याची सुविधा
पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदाराला एकतर एकरकमी रक्कम किंवा त्या पैशासाठी पेन्शन पॉलिसी मिळेल. या योजनेत गुंतवणूक केल्यास सेक्शन 80 सी अंतर्गत प्रीमियममध्ये सूट देण्यात आली आहे. पेन्शनची रक्कम करपात्र आहे. तथापि, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, नामनिर्देशित व्यक्तीला मिळालेला पैसा करमुक्त असतो.
महिन्याला 8750 रुपयांची पेन्शन हवी असेल तर काय कराल?
तुमचे वय कमी असल्यास न्यू जीवन शांती योजनेचा अधिक लाभ मिळतो. समजा तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षी या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले आहेत, तर 20 वर्षांनंतर तुम्हाला दरवर्षी 1.05 लाख रुपये मिळायला सुरुवात होईल. याचा अर्थ दरमहा तुम्हाला 8750 रुपये मिळतील. या पॉलिसीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही गुंतवणुकीच्या 5 वर्षांनंतरही तुमचे मासिक पेन्शन निश्चित करू शकता. मात्र, पेन्शनची रक्कम कमी होईल. या योजनेमध्ये 21.6 टक्के दराने वार्षिक व्याज मिळते.
संबंधित बातम्या:
पेन्शनधारकांचं टेन्शन दूर, आता व्हॉट्सअॅपवर मिळणार पेन्शनशी संबंधित माहिती
‘या’ सरकारी योजनेते 55 रुपये गुंतवा आणि म्हातारपणी प्रत्येक महिन्याला मिळवा 3000 रुपयांची पेन्शन