EPS Benefits Alert | सरकारचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनाही अजीवन पेन्शन, अमृत महोत्सवी वर्षात सरकारचा मदतीचा हात

EPS Benefits Alert | कर्मचारी निवृत्ती योजनेतील वारसदारांविषयी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सदस्य कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर विधवा पत्नी इतकेच मासिक पेन्शन आई-वडिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

EPS Benefits Alert | सरकारचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनाही अजीवन पेन्शन, अमृत महोत्सवी वर्षात सरकारचा मदतीचा हात
सरकारचा मोठा निर्णयImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 12:13 PM

EPS Benefits Alert | केंद्र सरकार अनेक सामाजिक सुरक्षा योजना (Social Security Scheme) राबविते. यामध्ये कर्मचारी निवृत्ती योजना 95 याचा ही समावेश होतो. संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेतंर्गत (EPFO) पीएफ खाते उघडण्यात येते. या खात्यात EPS चेही खाते अंतर्भूत असते. या खात्याला कर्मचारी पेन्शन योजना(Employee Pension Scheme), ईपीएस (EPS)95 अथवा ईपीएफ (EPF)पेन्शन अशा नावाने ओळखल्या जाते. ईपीएस योजनेविषयीचा एक वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात गाजत आहेत. त्यावर चर्चा ही झडत आहे. पण सरकारने या दरम्यान एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीप्रमाणेच त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या आई-वडिलांनाही अजीवन मासिक पेन्शन (Lifelong Monthly Pension) देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

ईपीएफओने केले ट्विट

कामगार आणि रोजगार मंत्रालय (Labour and Employment Ministry) आणि भविष्य निर्वाह निधी संघटनेने याविषयीचे ट्विट केले आहे. संघटनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन (Twitter Handle) हे ट्विट करण्यात आले आहे. त्यानुसार, ईपीएस 95 योजनेतंर्गत पालक आणि वारसांना फायदा या शिर्षकाखाली योजनेतील महत्वाचा बदल जाहीर करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आता कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला जेवढे मासिक पेन्शन मिळते. तेवढेच मासिक पेन्शन तेही अजीवन कर्मचाऱ्याच्या पालकांना, आई-वडिलांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

आई-वडिलांना मोठा दिलासा

या निर्णयाचा संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पालकांना,आई-वडिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. विधवा पत्नीसोबतच कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांनाही त्याचा फायदा पोहचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यापूर्वी सरकारने कर्मचाऱ्याची विधवा पत्नी आणि मुलांनाही या योजनेतंर्गत लाभ दिला आहे. विशेष म्हणजे आई-वडिलांचे नाव वारस म्हणून जोडले नसले तरी या योजनेतंर्गत विहित कागदपत्रांआधारे पालकांनाी फायदा मिळणार आहे. आता कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील कितवा हिस्सा पालकांना देण्यात येईल आणि सरकार त्यात कितीची भर घालणार याविषयीची माहिती समोर आलेली नाही.

काय आहे योजना?

ईपीएफओ अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातील (बेसिक+ महागाई भत्ता) 12 टक्के रक्कमेचे योगदान पीएफ खात्यात करण्यात येते. नियोक्ता, म्हणजे तुमची कंपनी हे योगदान पीएफ खात्यात जमा करते. ही रक्कम दोन भागात विभागली जाते. 12 टक्क्यांतील 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जमा केली जाते तर 8.33 टक्के रक्कम ईपीएस 95 मध्ये जमा करण्यात येते. जमा रक्कमेनुसार, तुम्हाला निवृत्तीवेळी एक निश्चित पेन्शन मिळते.  योजनेतील बदलामुळे वृद्ध आई-वडिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.