शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांनो 30 सप्टेंबरपर्यंत ‘हे’ काम आटपा, अन्यथा ट्रेडिंगला लागेल ब्रेक
Share Market | तसेच केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने (CBDT) नव्या डिमॅट खात्यांसाठी पॅनकार्ड बंधनकारक केले आहे. तसेच हे पॅनकार्ड आधारशी जोडलेले असावे. हा नियम भांडवली बाजारातील सर्व घटकांसाठी सक्तीचा असेल.
मुंबई: तुम्ही भांडवली बाजारात (Share Market) गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला बदललेल्या नियमांनुसार काही गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे. अन्यथा आगामी काळात तुम्ही डिमॅट खात्यामधून शेअर्सची खरेदी आणि विक्री करु शकणार नाही. सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) निर्देशानुसार तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील महिन्यात तुमचे पॅनकार्ड रद्द होईल. परिणामी तुम्ही केवायसींची पूर्तता न झाल्यामुळे डिमॅट खात्यामधून व्यवहार करु शकणार नाही.
तसेच केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने (CBDT) नव्या डिमॅट खात्यांसाठी पॅनकार्ड बंधनकारक केले आहे. तसेच हे पॅनकार्ड आधारशी जोडलेले असावे. हा नियम भांडवली बाजारातील सर्व घटकांसाठी सक्तीचा असेल.
‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल; सहा महिन्यांत एका लाखाच्या गुंतवणुकीवर 7.65 लाख
पॅनकार्ड होऊ शकतं बाद किंवा आकारला जाऊ शकतो दंड
पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास ते बाद ठरते. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2021 नंतर कोणतेही बाद झालेले पॅनकार्ड जर तुम्ही वापरले तर प्राप्तिकर कलम 272 बी अंतर्गत 10,000 रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे जर करदात्यांनी 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बाद होऊ शकतं.
पॅनकार्ड रद्द झालं तर काय अडचणी येतील?
जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, पण ते आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध म्हणून घोषित केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय रिटर्न भरणंदेखील शक्य नाही.
पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?
– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.
– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.
– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.
– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.
संबंधित बातम्या:
मनात आणलं तर या व्यवसायात लाखापर्यंत कमवाल, खूप फायद्याची आहे बिझनेस आयडिया
घरात पडून असलेल्या सोन्यातून लाखो कमाव, काय आहे SBI ची खास Gold Scheme ?
आनंदाची बातमी! सरकारने वाढवली कौटुंबिक पेन्शनची मर्यादा, 45 हजार रुपयांवरून आता दरमहा….