म्युच्युअल फंडांला आधार कार्डशी असे जोडा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

केंद्र सरकारने गुंतवणुकदारांना म्युच्युअल फंड आधार कार्डशी जोडण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता पॅन, मोबाइल क्रमांक आणि बँक खात्यानंतर तुम्हाला म्युच्युअल फंडातील गुंतवणूक तुमच्या आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे.

म्युच्युअल फंडांला आधार कार्डशी असे जोडा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 1:39 PM

केंद्र सरकारने लोकांना म्युच्युअल फंड (Mutual Fund) आधार कार्डशी जोडण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता पॅन(PAN), मोबाइल क्रमांक आणि बँक खात्यानंतर (Bank Account) तुम्हाला म्युच्युअल फंडातील गुंतवणूक तुमच्या आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडांना आधार कार्डशी (Aadhar Card) लिंक करणे ही एकवेळची प्रक्रिया असून, अनेक पर्यायांसह ती अधिक सोपी करण्यात आली आहे. गुंतवणुकदार ऑनलाइन, ऑफलाइन, एसएमएस आणि ई-मेल आधारे त्यांचे आधार कार्ड म्युच्युअल फंडाशी जोडू शकतात. या जोडणीसाठी तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडांच्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनीशी (AMC) थेट त्यांच्या संकेतस्थळाशी संपर्क साधू शकता. काहींच्या होम पेजवरच लिंक असते, जेणेकरून तुम्हाला आधार डिटेल्स अपडेट करण्यासाठी संबंधित पेजवर नेण्यात येते. याठिकाणी म्युच्युअल फंडाचा फोलिओ क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांकाची नोंदणी करा. या माहितीसह गुंतवणुकदाराला त्यांचं नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी आणि आधार लिंक्ड मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. सुरक्षित गुंतवणुकीसाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. तसेच यामुळे नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती व्यवहारातून समोर येणार आहे.

1. म्युच्युअल फंड रजिस्टरर्स आणि ट्रान्स्फर एजंट्स (RTAs) यांच्यामार्फतही हे काम करता येईल. उदाहरणार्थ, Computer Edge Management Services Private Limited (Cams).

2. सर्वप्रथम पॅन, आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख आणि लिंग यासह आपली सर्व माहिती नोंद करा.

3. आपल्या गुंतवणुकीनुसार स्क्रीनवर दिसणाऱ्या सर्व फंड हाऊसेसची निवड तुम्ही करू शकता.

4. त्यानंतर जनरेट ओटीपी पर्यायावर क्लिक करा.

5. यानंतर ओटीपी टाका आणि व्हेरिफायवर क्लिक करा.

ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला पोचपावती (acknowledgement) मिळेल, ज्यात ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा उल्लेख असेल. आपल्याला UIDAI कडून याबद्दल ईमेल देखील प्राप्त होईल.

ऑफलाईन प्रक्रिया

ऑनलाइन पर्याय अस्तित्वात नसेल तर तुम्ही तुमच्या AMCला थेट फोन करून आधारशी लिंक करण्याची विनंती करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरून तो योग्य त्या सर्व तपशीलांसह सबमिट करावा लागेल.

जे CAMS किंवा कार्वीद्वारे लिंक करत आहेत त्यांना अधिकृत पोर्टलवरून आधार अपडेट रिक्वेस्ट फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. त्यानंतर, त्यांना ते पूर्णपणे भरावे लागेल आणि कार्वी ऑफिसजवळील CAMSवर जमा करावे लागेल. यासोबतच त्यांना त्यांच्या आधार कार्डची स्वसाक्षांकित प्रतही सादर करावी लागणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.