LPG Gas Cylinder Price Hike: घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ होणार?

LPG Gas | पेट्रोलियम कंपन्यांकडून प्रत्येक महिन्यात इंधन आणि LPGच्या दरांचा आढावा घेतला जातो. यावेळी दर कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा निर्णय घेतला जातो. प्रत्येक राज्यात पेट्रोलियम पदार्थांवर वेगवेगळा कर आकारला जातो. त्यामुळे दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता या शहरांमध्ये LPG सिलिंडरचा दर वेगवेगळा आहे.

LPG Gas Cylinder Price Hike: घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ होणार?
आता मिस्ड कॉल देऊन मिळवा एलपीजी कनेक्शन
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 7:55 AM

मुंबई: इंधन दरवाढ आणि महागाईमुळे अगोदरच मेटाकुटीस आलेल्या सामान्य नागरिकांना आता आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पेट्रोलियम कंपन्यांकडून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये पुन्हा वाढ केली जाऊ शकते. तसे घडल्यास ‘कॉमन मॅन’च्या घरातील किचन बचेट कोलमडण्याची शक्यता आहे.

सध्याच्या घडीला देशभरात 14.2 किलोच्या LPG सिलिंडरसाठी साधारण 834 ते 861 रुपये मोजावे लागतात. सध्याची पेट्रोल-डिझेलची वाटचाल पाहता केंद्र सरकार लवकरच LPG सिलिंडरच्या दरातही वाढ करेल, अशी चर्चा सुरु आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भात निर्णय होऊ शकतो.

पेट्रोलियम कंपन्यांकडून प्रत्येक महिन्यात इंधन आणि LPGच्या दरांचा आढावा घेतला जातो. यावेळी दर कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा निर्णय घेतला जातो. प्रत्येक राज्यात पेट्रोलियम पदार्थांवर वेगवेगळा कर आकारला जातो. त्यामुळे दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता या शहरांमध्ये LPG सिलिंडरचा दर वेगवेगळा आहे.

गेल्या महिन्यातच दरवाढ

पेट्रोलियम कंपन्यांनी गेल्या महिन्यातच घरगुती सिलिंडरच्या दरात 25.50 रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे 1 जून रोजी मुंबईत घरगुती सिलेंडरची किंमत 809 रुपयांवरून 834 रुपयांपर्यंत पोहोचली होती. तर चेन्नई आणि कोलकातामध्ये LPG सिलिंडरचा दर अनुक्रमे 825 आणि 835.50 रुपये इतका होता. तो आता अनुक्रमे 850.50 आणि 861 रुपये इतका झाला आहे.

एलपीजी किंमत कशी तपासाल?

एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या संकेतस्थळावर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या संकेतस्थळावर आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.

संबंधित बातम्या:

गॅस सिलिंडर झटपट बुक कसा कराल, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

LPG cylinder Booking: ‘या’ अ‍ॅपसह गॅस सिलिंडर बुक करा, बंपर कॅशबॅक मिळवा, जाणून घ्या फायदा

फक्त एका कॉलवर मागवा 5 किलोचा LPG गॅस सिलिंडर, कागदपत्रांचीही गरज नाही

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.