ट्रेन नव्हे तर रुळांवर धावणारा महाल; एका तिकीटाची किंमत 9.42 लाख रुपये

Palace on Wheels | या ट्रेनमध्ये 39 डिलक्स केबिन आणि 2 सुपर डिलक्स केबिन्सचा समावेश आहे. प्रत्येक केबिनमध्ये अटॅच्ड वॉशरुम आहे. प्रत्येक केबिनला राजस्थानातील महाल किंवा किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे.

ट्रेन नव्हे तर रुळांवर धावणारा महाल; एका तिकीटाची किंमत 9.42 लाख रुपये
पॅलेस ऑन व्हिल्स
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 7:30 AM

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेचा कारभार हा एरवी वादाचा विषय असला तरी त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या काही सेवा या निश्चितच जागतिक दर्जाच्या असतात. यापैकी एक म्हणजे लक्झरी एक्स्प्रेस ट्रेन्स (Luxury trains). सध्या देशात कोरोना संकटामुळे पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे. मात्र, त्यापूर्वी भारतातील पाच एक्स्प्रेस ट्रेन्स देशी आणि विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरत होत्या. यामध्ये महाराजा एक्स्प्रेस, पॅलेस ऑन व्हिल्स, द डेक्कन ओडिशी, गोल्डन चॅरिएट आणि रॉयल ओरिएंट ट्रेनचा समावेश आहे. यापैकी पॅलेस ऑन व्हिल्स (Palace on Wheels) ही एक्स्प्रेस गाडी म्हणजे ट्रेन नव्हे तर रुळावर धावणारा महालच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. (Luxury trains in India know all about palace on wheels)

Palace on Wheels ट्रेन कधी सुरु झाली?

पॅलेस ऑन व्हिल्स ही देशातील पहिली लक्झरी ट्रेन आहे. 26 जानेवारी 1982 रोजी ही ट्रेन पहिल्यांदा धावली. राजस्थानातील पर्यटकांमध्ये ही ट्रेन विशेष लोकप्रिय आहे. या ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना राजस्थानातील महाल आणि किल्ल्यांची सफर घडवली जाते. या ट्रेनमध्ये 39 डिलक्स केबिन आणि 2 सुपर डिलक्स केबिन्सचा समावेश आहे. प्रत्येक केबिनमध्ये अटॅच्ड वॉशरुम आहे. प्रत्येक केबिनला राजस्थानातील महाल किंवा किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे.

शाही महालाचा आभास

या ट्रेनमधील अंतर्गत सजावट ही डोळे विस्फारायला लावणारी आहे. प्रत्येक केबिनला आकर्षक रंग देण्यात आले आहेत. Palace on Wheels मध्ये एक आयुर्वेदिक स्पा देखील आहे. तसेच बार आणि रेस्टॉरंटदेखील आहे. याठिकाणी तुम्ही शाही भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. जगातील लक्झरी ट्रेन्सची तुलना करायची झाल्यास Palace on Wheels चा चौथा क्रमांक लागतो. ही ट्रेन दिल्ली ते जयपूर, जयपूर ते सवाई माधोपूर, सवाई माधोपूर ते चित्तोडगड, चित्तोडगड ते उदयपूर, उदयपूर ते जोधपूर, जोधपूर ते जैसलमेर, जैसलमेर ते भरतपूर, भरतपूर ते आग्रा आणि आग्रा ते दिल्ली असा प्रवास करते.

पॅलेस ऑन व्हिलच्या तिकीटाची किंमत?

* 7 नाइट्स डिलक्स केबिन सिंगल ऑक्युपन्सी (एका प्रवाशासाठी)- 5,23,600 रुपये * 7 नाइट्स सुपर डिलक्स केबिन- 9,42,480 रुपये * भारतीय प्रवाशांसाठी- 2,10,000 आणि 4.5 % सर्व्हिस टॅक्स (प्राथमिक भाडे) * आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी- 3,500 अमेरिकी डॉलर आणि 4.5 % सर्व्हिस टॅक्स (प्राथमिक भाडे)

(Luxury trains in India know all about palace on wheels)

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.