Currency Notes : 500 रुपयांच्या नोटेवरुन पुन्हा घमासान! जर तुमच्याकडे असेल ही नोट तर, काय कराल?

Currency Notes : बाजारात सध्या दोन प्रकारच्या 500 रुपयांच्या नोटा प्रचलित आहेत. त्या व्यवहारात वापरण्यात येतात. त्यात बोगस नोटा नाहीत, असा दावा नाही. पण दोन्ही खऱ्या नोटांबाबत ही आता महाभारत सुरु आहे. काय आहे नेमका वाद आणि आरबीआयचं काय आहे नेमकं म्हणणं?

Currency Notes : 500 रुपयांच्या नोटेवरुन पुन्हा घमासान! जर तुमच्याकडे असेल ही नोट तर, काय कराल?
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 11:37 AM

नवी दिल्ली : बाजारात सध्या दोन प्रकारच्या 500 रुपयांच्या नोटा (500 Rupee Note) प्रचलित आहेत. त्या व्यवहारात वापरण्यात येतात. त्यात बोगस नोटा नाहीत, असा दावा नाही. पण दोन्ही खऱ्या नोटांबाबत ही आता महाभारत सुरु आहे. 2016 मध्ये नोटबंदी घडली. त्यावरुन देशात मोठे वादंग उठले. या नोटबंदीतून काय साध्य झालं आणि त्याचे काय परिणाम झाले, एव्हाना हे सर्वांनाच माहिती आहे. केंद्र सरकारने केलेली ही आर्थिक सर्जिकल स्ट्राईकमधून काय हाती लागलं, हा सध्या करमणुकीचा तेवढा विषय झाला आहे. सरकारला त्यावेळी 500 रुपयांच्या नोटेने आधार दिला होता. 500 रुपयांच्या नोटा प्रचलित आहेत. त्या व्यवहारात वापरण्यात येतात. त्यात बोगस नोटा नाहीत, असा दावा नाही. पण दोन्ही खऱ्या नोटांबाबत ही आता महाभारत सुरु आहे. काय आहे नेमका वाद आणि आरबीआयचं काय आहे नेमकं (Latest Update) म्हणणं?

सध्या बाजारात 500 रुपयांच्या दोन प्रकारच्या नोटा प्रचलित आहेत. या दोन्ही नोटांमध्ये तसे विशेष अंतर नाही. या दोन्ही नोटा एका नजरेत ओळखता येत नाहीत. आता यामध्ये एक नोट नकली असल्याचा सारखा दावा करण्यात येत आहे. काही दुकानदारांनी तर थेट नोट घेण्यास नकार दिला आहे. सोशल मीडियात तर याविषयीचे व्हिडिओ शेअर करुन अनेक स्वयंघोषीत तज्ज्ञ विवध दावे प्रतिदावे करत आहेत. त्यामुळे शेवटी आरबीआयला याप्रकरणी मौन सोडावे लागले.

समाज माध्यमांवर शेअर होत असलेल्या व्हिडिओत एक प्रकारची पाचशे रुपयांची नोट नकली असल्याचा दावा करण्यात येत आहे. पत्र सूचना कार्यालयाने (PIB Fact Check) याविषयीचा सत्यता तपासली आहे. सत्यता तपासल्यानंतर या व्हिडिओची सत्यता समोर आली आहे. 500 रुपयांच्या नोटेत आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरी जवळ हिरवी पट्टी नसेल अथवा गांधीजींच्या छायाचित्राजवळ हिरवी पट्टी असेल तर ही नोट न खरेदी करण्याचे आवाहन या व्हिडिओत करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

अर्थात या व्हिडिओमुळे समाजात खऱ्या नोटेविषयी संभ्रम असतानाच, दुसऱ्या पाचशेच्या नोटेवरुन पण गैरसमज वाढला. त्यामुळे अखेर या प्रकरणी केंद्रीय बँकेला हस्तक्षेप करावा लागला. समाज माध्यमांवर विविध दावे करणारे व्हिडिओ पुर्णपणे खोटे असल्याचे समोर आले. सध्या अस्तित्वात असलेल्या दोन्ही पाचशे रुपयांच्या नोटा या मान्य असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले. यातील कोणतीही नोट तुमच्याकडे असेल तर चिंतेचे बिलकुल कारण नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. दोन्ही प्रकारच्या नोटा बाजारात प्रचलित असून त्या मान्य असल्याचे बँकेने सांगितले आहे.

जर तुमच्याकडेही अशा प्रकारचे खोटे दावे करणारा व्हिडिओ, फेक मॅसेज असेल तर चिंता करु नका. अशा मॅसेजचा पडताळा घ्या. याविषयीचे वृत्त तुमच्याकडे आले असेल, तर ते फॉरवर्ड करण्याऐवजी ते तपासा. असे मॅसेज, व्हिडिओ तुम्ही पीआयबीच्या अधिकृत संकेतस्थळावर, https://factcheck.pib.gov.in पाठवू शकता. यासोबतच पीआयबीच्या व्हॉट्सअप क्रमांक 918799711259 अथवा pibfactcheck@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.