महिलांनो… 1 एप्रिलपासून त्या योजनेचा लाभ मिळणार नाही, मोठी अपडेट काय?; आता पुढे काय?
Women Scheme : 1 एप्रिल 2025 रोजीपासून महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही. या योजनेने दोन वर्षात महिलांना चांगला आर्थिक फायदा मिळवून दिला होता. या योजनेवर 7.5% व्याज मिळत होते. आता ही योजना बंद होत आहे.

Mahila Samman Savings Certificate : गरीब, तरुण, शेतकरी आणि महिला यांच्यावर मोदी सरकार गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने काम करत आहे. त्याविषयीच्या योजना आणत आहे. त्यातच मागील बजेटमध्ये महिला सम्मान बचत योजना सुरू करण्यात आली होती. 1 एप्रिल 2025 रोजीपासून ही योजना बंद होत आहे. आता महिलांना या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही. महिला सम्मान बचत योजनेत 7.5% आकर्षक व्याजदर मिळत होता.
दोन वर्षांपूर्वी योजना
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये ही योजना जाहीर केली होती. महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) या 1 एप्रिल 2023 रोजीपासून सुरु करण्यात आली होती. ही योजना केवळ महिलांसाठी आहे. एक रक्कमी रोख भरल्यानंतर हमीपात्र रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. या योजनेत महिला वा लहान मुलीच्या नावे 31 मार्च 2023 पासून दोन वर्षांसाठी खाते उघडण्यास सुरुवात झाली होती.




पोस्ट ऑफिस, बँकेत खाते
महिला सम्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत कोणतीही महिला अथवा लहान मुलीच्या नावे पालकांना खाते उघडता येत होते. योजनेनुसार 31 मार्च 2023 पासून दोन वर्षांसाठी खाते उघडता येत होते. या योजनेत गुंतवणूकदारांना एकल प्रकारचे खाते उघडता येत होते. खाते पोस्ट ऑफिस अथवा बँकेत खाते उघडण्याची सोय होती.
दोन लाखांपर्यंतची मर्यादा
या योजनेत गुंतवणूकदारांना 7.5 टक्के निश्चित व्याज देण्यात येत आहे. दोन वर्षांच्या कार्यकाळात, महिला अथवा लहान मुलींच्या नावे दोन लाख रुपयांपर्यंत ठेव ठेवता येत होती. या योजनेत कमीत कमी 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करता येत होते. वार्षिक 7.5 टक्के व्याज तिमाहीत जमा होत होते.
2 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पहिल्या तिमाहीत या रक्कमेवर 3,750 रुपयांचे व्याज मिळेल. दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी या रक्कमेवर दुसऱ्या गुंतवणुकीवर 3,820 रुपये व्याज मिळेल. दोन वर्षानंतर या योजनेतील लाभार्थ्याला एकूण 2,32,044 रुपये मिळतील. पण कोणत्याही आर्थिक वर्षात या योजनेतील व्याजाचा आकडा 40 हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर कलम 194ए अंतर्गत टीडीएस देण्याची तरतूद करण्यात आली होती. या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2025 ही आहे.