UPI पेमेंट आता करा इंटरनेट विना, सरकारच्या एका निर्णयाने ग्राहकांना मोठा दिलासा, व्यवहाराची इतकी वाढवली मर्यादा

New Transaction Limit : केंद्रीय रिझर्व्ह बँकेने विना इंटरनेट UPI123 ची अगोदरच सुविधा सुरु केली आहे. पण सुरुवातीला याची व्यवहार मर्यादा कमी होती. आता ती वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यवहाराला आता चालना मिळणार आहे. विना इंटरनेट सुद्धा मोठी रक्कम एका मिनिटात पाठवता येणार आहे.

UPI पेमेंट आता करा इंटरनेट विना, सरकारच्या एका निर्णयाने ग्राहकांना मोठा दिलासा, व्यवहाराची इतकी वाढवली मर्यादा
युपीआय पेमेंट
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 11:42 AM

सध्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस पेमेंटचा (UPI) वापर सर्वाधिक होत आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत छोट्या-मोठ्या व्यवहारांसाठी नागरिक सहज युपीआय पेमेंट करतात. हे पेमेंट सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने होते. ही व्यवहाराची प्रक्रिया सुरक्षित आहे. ग्राहक अवघ्या काही सेकंदात त्याची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जमा करतो. त्याला सोबत रोख रक्कम ठेवण्याची गरज पडत नाही. त्यातून वेळेची बचत होते. तर सहज सुलभ व्यवहार होत असल्याने युपीआयचा वापर झपाट्याने वाढला आहे. त्यात अजून एक मोठी बातमी येऊन धडकली आहे.

विना इंटरनेट करा पेमेंट

युपीआयचा वापर स्मार्टफोन धारकांनाच करता येतो, असा एक समज आहे. पण सरकारने अगोदरच बेसिक फोनचा वापर करणाऱ्यांसाठी सुद्धा युपीआय सुरु केले आहे. म्हणजे विना इंटरनेट सुद्धा युपीआयाच वापर करता येईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यासाठी UPI 123Pay ही सुविधा सुरु केली आहे. त्याआधारे साध्या मोबाईलवरून सुद्धा पेमेंट करता येईल. आता विना इंटरनेट UPI 123Pay च्या माध्यमातून 10,000 रुपयांपर्यंत व्यवहार करता येईल.

हे सुद्धा वाचा

असा करा विना इंटरनेट व्यवहार

ज्या युझर्सकडे स्मार्टफोन नाही, ते IVR (Interactive Voice Response) च्या माध्यमातून व्हॉईस पेमेंट करू शकतात. त्यासाठी एका IVR क्रमांकावर कॉल करावा लागेल. त्यानंतर कीपॅडवरून योग्य पर्याय निवडून पेमेंट करावे लागेल.

प्रॉक्सिमिटी साऊंड-बेस्ड पेमेंट करता येईल. एका खास टोनद्वारे हे पेमेंट करता येईल. त्यासाठी फोनमधील POD चा वापर करता येईल. त्यानंतर कीपॅडवरून योग्य पर्याय निवडून पेमेंट करावे लागेल.

युझर मिस्ड कॉल देऊन पेमेंट करू शकतात. त्यासाठी तुम्हाला एका नंबरवर कॉल करावा लागेल. कॉल आल्यावर तुमचा UPI PIN टाकून व्यवहार पूर्ण करता येईल. या पद्धतीत किचकट वाटत असल्या तरी त्या सोप्या आणि सुटसुटीत आहेत. एकदा तुम्ही त्याचा वापर सुरु केला तर तुम्हाला सहज त्याचा वापर करता येईल आणि व्यवहार करता येईल.

Non Stop LIVE Update
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'.
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?.
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय.