नव्या वर्षात तुमच्या मुलीचे भविष्य बनवा अधिक सुरक्षीत; सुकन्या समृद्धी योजनेचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?
तुम्हाला जर मुलगी असेल तर नव्या वर्षात तुम्ही तिचे भविष्य अधिक सुरक्षीत करू शकता. पोस्ट खात्याने तशी संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट खात्याच्या या योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात.
नवी दिल्ली : तुम्हाला जर मुलगी असेल तर नव्या वर्षात तुम्ही तिचे भविष्य अधिक सुरक्षीत करू शकता. पोस्ट खात्याने तशी संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट खात्याच्या या योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेमध्ये पैसे गुंतवण्याचे दोन मुख्य फायदे आहेत. पहिला म्हणजे तुमची गुंतवणूक देखील होते, तसेच पुढे तुम्ही हेच पैसे मुलीच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी वापरू शकता. मुलीच्या उज्वल भविष्यासाठी केंद्र सरकारकडून 2014 साली ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. आज आपण या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.
खाते कोणाला उघडा येते?
अशी मुलगी जीचे वय हे दहा वर्षांपेक्षा लहाण आहे, तिच्या आईवडील, भाऊ किंवा तिच्या पालकांना या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेनंतर्गत पोस्टामध्ये खाते उघडता येते. एका मुलीच्या नावाने तुम्ही एकच खाते उघडू शकता. या खात्यावर तुम्हाला दरवर्षी एक ठराविक रक्कम दर वर्षाला जमा कारवी लागते.
गुंतवणुकीचे नियम
पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना ही अगदी सर्व सामान्य माणसांचा विचार करून बनवण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेत फार मोठी रक्कम गुंतवण्याची आवश्यकता नसते. तुम्ही या योजनेंतर्गंत आपल्या मुलीचे खाते उघडून दर वर्षाला कमीत कमी 250 रुपये तर जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. जेव्हा तुमची मुलगी वयाचे अठरा वर्ष पूर्ण करते, तेव्हा या योजनेचा तिला लाभ मिळतो. हाच पैसा पुढे तिच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तुम्ही वापरू शकता. वेळेवर पैसा हातात असल्याने तुमच्यावर आर्थिक ताण येत नाही.
व्याज किती मिळते?
बँकेच्या किंवा पोस्टाच्या इतर योजनेच्या तुलनेत समृद्धी सुकन्या योजनेंतर्गंत तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर चांगले व्याज मिळते. पोस्ट ऑफीसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या या योजनेवर 7.6 दराने व्याज मिळते. वर्षाच्या शेवटी हे व्याज तुमच्या खात्यात जमा केले जाते. एवढेच नाही तर या योजनेत पैसे गुंतवल्यास तुम्हाला नियमानुसार इनकम टॅक्समधून देखील सूट मिळते.
संबंधित बातम्या
अधिक चांगला परतावा पाहिजे?, तर नवीन वर्षात ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक
‘लिबोर’ पर्वाचा अस्त: कर्ज दर निश्चितीची नवी संरचना, स्टेट बँक बदलासाठी सज्ज
वर्ष 2022: नियोजन हेच धोरण, तुमच्या प्रभावी ‘अर्थ’संकल्पासाठी ‘6’ मंत्र!