Personal Loan | अतिव्याजाच्या कर्जाचा बोझा वाढतोय, तेव्हा अनेक वेळा पर्सनल लोन मदतीचं ठरु शकतं

अनेक समस्या सोडवण्यासाठी पैसा उपयुक्त ठरतो. त्यामुळे आपत्कालीन फंड तयार करून ठेवणे आवश्यक आहे.

Personal Loan | अतिव्याजाच्या कर्जाचा बोझा वाढतोय, तेव्हा अनेक वेळा पर्सनल लोन मदतीचं ठरु शकतं
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 7:19 PM

मुंबई : पैसा कमावणं जेवढं महत्त्वाचं असतं तेवढंच पैशांचं नियोजनही तितकंच आवश्यक असतं. विविध आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून गुंतवणूक व्यवस्थापन करण्याला पर्सनल फायनान्स असं म्हणतात. आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुमची तयारी यातून दिसून येते. पर्सनल फायनान्सची तत्त्व काय आहेत, ते पाहुयात. जेणेकरून तुम्हाला वैयक्तिक आर्थिक उद्दिष्ट साध्य करता येतील आणि पैशांतून पुन्हा आणखी पैसा उभा करता येईल.

आपत्कालीन फंड तयार करणे आवश्यक

अनेक समस्या सोडवण्यासाठी पैसा उपयुक्त ठरतो. त्यामुळे आपत्कालीन फंड तयार करून ठेवणे आवश्यक आहे. इमर्जन्सी फंड तयार करण्यासाठी एखाद्या बँकेत खातं उघडून त्यात दर महिन्याला थोडी रक्कम भरू शकता. इमर्जन्सी असतानाच हा पैसा वापरला जावा.

हे सुद्धा वाचा

अति व्याजाच्या कर्जावर मात करणे

कार, घर किंवा इतर गरजांसाठी लोक वैयक्तिक कर्ज घेतात. त्यामुळे व्याजाच्या स्वरुपात दीर्घकाळासाठी भरमसाठ रक्कम भरावी लागते. ऑटोमॅटिक डेब्ट रिपेमेंट प्लॅनचा वापर करून तुम्ही दरमहिन्याला अधिक रक्कम भरू शकता. तसेच दरवर्षी कर्जाचा प्री-पे भाग भरूनही हे सोपं जातं. कर्जाचे हफ्ते फेडल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर वाढतो आणि व्याजही कमी होते.

निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचत

वृद्धापकाळासाठी बचत हा परिपूर्ण उपाय असतो. अशा स्थितीत निवृत्तीनंतरचं नियोजन महत्त्वाचं ठरतं. नोकरी आणि PF खातं असेल तर Voluntary Provident Fund च्या माध्यमातून तुम्ही यातील रक्कम वाढवू शकता. तुमचं PF अकाउंट नसेल तर PPF, ELSS, म्युच्युअल फंड असे रिकरिंग डिपॉझिटचे पर्याय आहेत. जेणेकरून दर महिन्याला तुमच्या पगारातून ठराविक रक्कम संबंधित खात्यात डिपॉझिट करता येते.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक

शेअर्सद्वारे दीर्घकालीन परतावे चांगले मिळतात. एफडी किंवा आरडीपेक्षा स्टॉक मार्केटमधून जास्त परतावे मिळतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी मार्केटचा पूर्ण रिसर्च करणे आवश्यक आहे.

विमा पॉलिसीत गुंतवणूक

अचानक उद्भवणाऱ्या संकटांपासून आपलं तसंच कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी विमा पॉलिसी खरेदी करणे आवश्यक आहे. आयुष्यातील सुरुवातीच्या टप्प्यावरच पॉलिसी खरेदी करणे चांगले असते. जेणेकरून कमी प्रिमियम भरावे लागते. यासह, हेल्थ इन्शुरन्सही चांगला असतो. यामुळे ट्रीटमेंटच्या खर्चाचे ओझे सहन करता येते.

पर्सनल फायनान्सचे व्यवस्थापन करण्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा- IIFL (https://www.iifl.com/?utm_source=TV9&utm_medium=article&utm_campaign=IIFL_articles&utm_content=english&utm_term=Sept_22)

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.