क्रेडिट कार्ड ऑनलाईन अप्लाय करण्याचे बरेच फायदे; जाणून घ्या बँकांची ही सोपी प्रक्रिया
बँकांकडून दिल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्डवर वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मिळतात. या सुविधा बँकांवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येक बँकांच्या बाबतीत सुविधांमध्ये फरक आढळून येईल.
नवी दिल्ली : कोणत्याही ग्राहकाला क्रेडिट कार्ड देण्याआधी बँक त्या ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर जाणून घेत असते. बँकेला खात्री करून घ्यायची असते कि बँकेने दिलेले पैसे कुठेही, कसल्याही कारणास्तव फसू नयेत, अर्थात बँकेचे पैसे बुडू नयेत. या पार्श्वभूमीवर सर्व पडताळणी करूनच क्रेडिट कार्ड जारी करीत असते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला वेळेत क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर तुम्ही क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अप्लाय केलेले केव्हाही उत्तम ठरू शकेल. यामुळे तुमचा वेळ वाचेल तसेच अनेक सुविधांचा फायदाही घेता येईल. ग्राहकाने ऑनलाईन अप्लाय केले असेल तर बँकेला त्या ग्राहकाच्या नेटबँकिंगच्या माध्यमातून आवश्यक तो तपशील सहज मिळतो. म्हणजेच बँकेची प्रक्रिया सोपी होऊन त्याचा ग्राहकाला फायदा होतो. (Many benefits of applying for a credit card online; know this simple process of banks)
मोफत मिळणाऱ्या सुविधा
बँकांकडून दिल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्डवर वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मिळतात. या सुविधा बँकांवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येक बँकांच्या बाबतीत सुविधांमध्ये फरक आढळून येईल. वेगवेगळी कार्डे आणि त्यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाईन संशोधन करणे सोपे असते. या सुविधांमध्ये रिवॉर्ड पॉइंट, एयरपोर्ट लाऊंज एक्सेस, कॅशबॅक, गिफ्ट व्हाउचर तसेच इतर वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
बँकांमार्फत को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सदेखील मिळतात. या कार्डवर डिस्काउंट व इतर काही सुविधा मिळतात. याला अनुसरून तुम्हालाही अधिक सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन शोध घ्या, सर्व कार्डांची त्याच्या सर्व वैशिष्ट्यांनुसार माहिती जाणून घ्या, नंतरच कुठले क्रेडिट कार्ड घ्यायचे आहे ते ठरवा. अशा प्रकारच्या ऑनलाईन पडताळणीमुळे नक्कीच तुम्ही चांगले फायदेशीर, उपयुक्त क्रेडिट कार्ड मिळवू शकाल.
को-क्रेडिट कार्डचे फायदे
याबाबतीत ऍक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचे उदाहरण उत्तम ठरेल. ही बँक 22 वेगळ्या प्रकारची क्रेडिट कार्ड जारी करते. यात अनेक क्रेडिट कार्ड विस्तारा, फ्लिपकार्ट, फ्रीचार्ज आणि इंडियन ऑयल यांसारख्या कंपन्यांबरोबर को- ब्रॅन्डेड आहेत. याचाच अर्थ असा कि, या आघाडीच्या कंपन्यांद्वारेही ग्राहकाला खास स्वरूपाच्या सुविधा दिल्या जातात. या सुविधा कॅशबॅकपासून ते खरेदी तसेच एअर माइल्स आणि एयरपोर्ट लाउंजच्या मोफत वापराच्या रूपात मिळतात. ग्राहक रेस्टोरंटचे बिल तसेच चित्रपटाच्या तिकिटावर डिस्काउंटही मिळवू शकतो.
ऑनलाईन अर्जामुळे मिळतात विविध सुविधा
जर तुम्ही बँकेत जाऊन क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करणार असाल तर ते काम वेळेत पूर्ण होईल कि नाही, याची शाश्वती देता येत नाही. मात्र ऑनलाईन अप्लाय केल्यावर अवघ्या काही सेकंदातही तुमच्या क्रेडिट कार्डच्या अर्जाला मंजुरी मिळू शकते. तेथून तुमचा विविध सुविधांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तुम्हाला केवळ बँकेच्या पोर्टलवर जाऊन तिथे आवश्यक ती माहिती नोंदवावी लागेल. बँकांमध्ये 18 पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांनाच क्रेडिट कार्ड देण्याचा नियम आहे. तुम्हाला फोटो तसेच इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईनच सबमिट करावी लागतील. नंतर काही वेळातच बँकेकडून तुमच्या अर्जाला मंजुरी मिळेल. (Many benefits of applying for a credit card online; know this simple process of banks)
रोहित पवारांच्या प्रयत्नांमुळे अपघातग्रस्त सतीशला मिळाले नवे आयुष्य#rohitpawar https://t.co/vo0W62FgBF
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 17, 2021
इतर बातम्या
मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज, सोमवारी पंढरपूरकडे रवाना होणार: अनिल परब