‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; एका वर्षात 514 टक्के रिटर्न्स

Mastek Ltd | समजा वर्षभरापूर्वी गुंतवणुकदाराने या कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याची किंमत 6.14 लाख रुपये इतकी झाली आहे. मंगळवारी Mastek लिमिटेडच्या समभागाने 4.3 टक्क्यांची उसळी घेत 2600 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला. गेल्या तिमाहीत कंपनीची कामगिरी अत्यंत उत्तम झाली होती.

'या' कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; एका वर्षात 514 टक्के रिटर्न्स
शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 10:26 AM

मुंबई: शेअर बाजारात सध्या Mastek लिमिटेड या कंपनीचा चांगलाच बोलबाला आहे. कारण या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. गेल्या वर्षभरात Mastek लिमिटेडच्या समभागधारकांना 514 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत. गेल्यावर्षी 20 जुलैला या कंपनीच्या समभागाची किंमत 423.55 रुपये इतकी होती. मात्र, वर्षभरात या समभागाची किंमत 2600 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.

समजा वर्षभरापूर्वी गुंतवणुकदाराने या कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याची किंमत 6.14 लाख रुपये इतकी झाली आहे. मंगळवारी Mastek लिमिटेडच्या समभागाने 4.3 टक्क्यांची उसळी घेत 2600 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला. गेल्या तिमाहीत कंपनीची कामगिरी अत्यंत उत्तम झाली होती.

गेल्या तीन महिन्यांमध्ये Mastek लिमिटेडच्या समभागाची किंमत 82 टक्के तर वर्षभरात शेअरचा भाव 122 टक्क्यांनी वधारला आहे. जून तिमाहीत कंपनीला 69.30 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. यापूर्वी मार्च तिमाहीतही कंपनीला 60.55 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

कंपनीचा व्यवसाय काय?

Mastek लिमिटेड ही कंपनी डिजिटल क्षेत्रात कार्यरत आहे. भारतासह तब्बल 41 देशांमध्ये या कंपनीचे ग्राहक आहेत.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.

एका सत्रात गुडलक इंडियाच्या शेअर्सची किंमत इतकी वाढली की, 10 टक्क्यांवर अप्पर सर्किट लागले. गेल्या पाच सत्रांमध्ये या समभागाची किंमत तब्बल 31 टक्क्यांनी वाढली आहे.

संबंधित बातम्या:

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या ‘स्मार्ट सेव्हिंग्स’मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती

Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स

एका वर्षात या बँकिंग इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, सरासरी 50 टक्क्यांहून अधिक उत्पन्न

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.