Bumper Offer : छप्परफाड ऑफर, कंपनीने केले मालामाल, एका शेअरवर मिळणार 100 शेअर

Bumper Offer : या कंपनीने गुंतवणूकदारांना छप्परफाड ऑफर दिली आहे.

Bumper Offer : छप्परफाड ऑफर, कंपनीने केले मालामाल, एका शेअरवर मिळणार 100 शेअर
बंपर कमाईImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 3:31 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारातील एक शेअर सध्या द्रुतगतीने पळत आहे. येत्या काही दिवसात हा शेअर गुंतवणूकदारांना तगडा रिटर्न देण्याची शक्यता आहे. एलस्टोन टेक्सटाईल (Alstone Textiles) या कंपनीचा हा शेअर आहे. ही मायक्रोकॅप टेक्सटाईल कंपनी (Microcap textile company)आहे. या कंपनीने आतापर्यंतचा सर्वात मोठा बोनस शेअर (Bonus Share) देण्याचा निर्णय घेतला आहे.

या कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळाने, 9:1 रेशोसह बोनस स्टॉक तर 1:10 रेशोने स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पात्र शेअरधारकाला या तगड्या ऑफरचा फायदा मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक शेअरला 1 रुपये फेस वॅल्यू सोबतच 10 इक्विटी शेअर मिळणार आहे.

म्हणजे कंपनी प्रत्येक शेअरला 1 रुपये फेस वॅल्यू तर देणारच आहे. सोबतच 100 इक्विटी शेअर पण देण्यात येणार आहे. याविषयीचा निर्णय झाला असून 3 डिसेंबर, 2022 पर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

बोनस शेअरच्या घोषणेनंतर या कंपनीच्या शेअर 5% वधरला आहे. शुक्रवारी या शेअरने कमाल केली. शेअर अपर सर्किट घेत 235.5 रुपयांवर बंद झाला. एलस्टोन टेक्सटाईलने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न (Multibagger Stock Return) दिला आहे.

अवघ्या एका महिन्यातच हा स्टॉक 89 रुपयांहून 235.5 रुपयांवर पोहचला. एका वर्षात या शेअरने 1,400% तगडा रिर्टन दिला आहे. त्यामुळे या कंपनीचे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

यापूर्वी Vintage Coffee and Beverages या पेनी शेअरने ही गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरमध्ये 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्या 50 टक्के घसरण नोंदविण्यात आली आहे. पण गेल्या दोन वर्षांचा विचार करता या शेअरने कमाल केली आहे.

हा शेअर 10 रुपयांहून थेट 53 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजे या शेअरने आतापर्यंत गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांचा परतावा दिला आहे. दोन वर्षांपूर्वी या शेअरचा भाव केवळ 10 रुपये होता. 2 ऑक्टोबर 2020 रोजी या शेअरचा भाव सर्वात कमी होता.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.