दुसऱ्याला जांभई देताना पाहून आपल्याला पण का येते? हे आहे यामागचे करण
अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासानुसार (Mirror Neuron System), मानवी जांभईचा संबंध थेट मेंदूशी असतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जांभईमुळे आपला मेंदू..

मुंबई : सोबतच्याला जांभई देताना पाहून तुम्हालाही कधी जांभई आली आहे का? अनेकांसोबत हे बऱ्याचदा घडले असेल. असे का घडते असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? इतरांकडे बघूनच आपल्याला जांभई का येते? खरंतर, असं होण्यामागे अनेक कारणं आहेत, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही. चला जाणून घेऊया यामागचे कारण काय आहे. अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासानुसार (Mirror Neuron System), मानवी जांभईचा संबंध थेट मेंदूशी असतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जांभईमुळे आपला मेंदू थंड होतो. खरं तर, जेव्हा आपण दिवसभर सतत काम करून थकतो किंवा जेव्हा आपली ऊर्जा पातळी कमी होऊ लागते, तेव्हा आपल्या मेंदूचे तापमान वाढते. मेंदूचे हे तापमान कमी करण्यासाठी शरीर जांभई देण्याची प्रक्रिया पार पाडते. जांभईमुळे गरम डोकं थंड होण्यास मदत होते.
जांभईमुळे पसरू शकतो संसर्ग
‘अॅनिमल बिहेविअर’ नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, जे लोकं सतत काम करतात किंवा दिवसभर काही कामात सक्रिय असतात, त्यांना काही वेळात जांभई येते. जांभई देऊनही संसर्ग पसरू शकतो हे अनेकांना माहीत नसते. म्युनिक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये सुमारे 300 लोकांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की जेव्हा इतरांनी जांभई दिली तेव्हा तेथे उपस्थित 150 लोकांनीही जांभई देण्यास सुरुवात केली.




इतरांना पाहून जांभई का येते?
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कारच्या पुढील सीटवर ड्रायव्हरसोबत बसलेल्या व्यक्तीने झोपणे किंवा जांभई येणे टाळावे. कारण त्यांना पाहून ड्रायव्हरला झोपेचा आणि जांभईचाही अनुभव येईल, जे वाहन चालवताना धोकादायक ठरू शकते. खरं तर, समोरच्या व्यक्तीला जांभई देताना पाहून मिरर न्यूरॉन सिस्टीम लगेच सक्रिय होते. मिरर न्यूरॉन प्रणाली इतरांना जांभईची नक्कल करण्यास भाग पाडते. यामुळेच आपल्याला जांभईही येऊ लागते.