AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mobile Charging : मोबाईल चार्जिंग करताय ? या चुका टाळा, नाहीतर होईल मोठे नुकसान

स्मार्टफोन चार्ज करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली नाही तर अशा परिस्थितीत तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे खराब होऊ शकतो. त्याच प्रमाणे मोबाईल विकत घेताना मिळालेलेच चार्जर वापरणे योग्य असते.

Mobile Charging : मोबाईल चार्जिंग करताय ? या चुका टाळा, नाहीतर होईल मोठे नुकसान
मोबाईलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 11:25 PM

मुंबई : आजच्या डिजिटल युगात आपण सर्वजण स्मार्टफोनचा (smartphones) मोठ्या प्रमाणात वापर करीत आहोत. स्मार्टफोनमुळे आपल्या जीवनात अनेक बदल दिसून आले असले तरी, दुसरीकडे स्मार्टफोन वापरताना अनेक समस्यांनाही तोंड द्यावे लागते. अनेक वेळा लोक तक्रार करतात की त्यांचा स्मार्टफोन चार्जिंगमध्ये ठेवल्याने तो खराब झाला. भारतात असे अनेक स्मार्टफोन युजर्स (Users) आहेत जे चुकीच्या पद्धतीने आपला मोबाईल वापरतात. जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने चार्ज (Charge) करत असाल तर तुमचा मोबाईल खराब होऊ शकतो. स्मार्टफोन चार्ज करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली नाही तर अशा परिस्थितीत तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे खराब होऊ शकतो. या लेखातून स्मार्टफोन चार्ज करण्याच्या योग्य पध्दती समजून घेणार आहोत.

ओरिजिनल चार्जरचाच वापर करा

अनेकदा असे दिसून येते, की लोक आपला स्मार्टफोन लवकर चार्ज करण्यासाठी बाजारातून फास्ट चार्जर खरेदी करतात. जर तुम्हीही ही चूक करत असाल तर त्याचे दुष्परिणामदेखील तुम्ही समजून घेतले पाहिजे. फास्ट चार्जर वापरल्याने तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे खराब होण्याचा धोका नाकारता येत नाही. तुमचा स्मार्टफोन नेहमी त्याच्यासोबत मिळालेल्या चार्जरनेच चार्ज केला पाहिजे. दुसरीकडे, जर तुमच्या स्मार्टफोनचा चार्जर खराब झाला असेल. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्याच फोनचा ओरिजिनल चार्जर विकत घेतला पाहिजे.

चार्जिंग करताना काळजी घ्यावी

बर्‍याच वेळा फास्ट चार्जिंगचा वापर केल्यावर स्मार्टफोन खूप गरम होऊ लागतो. यामुळे, मदरबोर्डच्या शॉर्टसर्किटची शक्यता वाढते. असे केल्याने तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे खराब होऊ शकतो किंवा त्याचा स्फोट होऊ शकतो. अशा स्थितीत स्मार्टफोन चार्ज करताना याची विशेष काळजी घेतली पाहिजे. याशिवाय मोबाइल चार्ज करण्यासाठी अनेक यूजर्स पीसी, लॅपटॉपसोबत सी टाइप चार्जर वापरतात. अशी चूक कधीही करू नये. असे केल्याने तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे खराब होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...