Gold Bond 2022 | सोन्यात स्वस्त आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय, प्रति ग्रॅम 5,197 रुपयांचा भाव, ही सुवर्ण संधी चुकवू नका

Sovereign Gold Bond | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme 2022-23) सुरु केली आहे. योजनेचा हा दुसरा टप्पा असून तो उद्या बंद होत आहे.

Gold Bond 2022 | सोन्यात स्वस्त आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय, प्रति ग्रॅम 5,197 रुपयांचा भाव, ही सुवर्ण संधी चुकवू नका
ही सुवर्ण संधी चुकवू नका Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 1:02 PM

Sovereign Gold Bond | सुरक्षित आणि स्वस्तात सोने खरेदी करण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहे. आज आणि उद्या तुम्हाला सरकारच्या सुवर्ण रोखे योजनेत सोने खरेदी करता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme 2022-23)आणली आहे. गोल्ड बाँडच्या विक्रीचा हा दुसरा टप्पा आहे. सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) सातत्याने चढ उतार होत असते. आता तर भारतातच बुलियन एक्स्चेंजची(Billion Exchange) सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोने आयात करणे सोप्पं झालं आहे. त्याचबरोबर देशभरात काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आता सोन्याचा एकच भाव (One Nation One Rate) राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणे हे फायदेशीर ठरणार आहे. रिझर्व्ह बँकेने या वर्षी 20 जून ते 24 जून दरम्यान सुवर्ण रोख्याची पहिली मालिका आणली होती.

ही तारीख महत्वाची

या योजनेची दुसरी मालिका 22 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. 26 ऑगस्ट म्हणजे उद्यापर्यंत सोने खरेदी करता येणार आहे.

एक ग्रॅमसाठी मोजा 5,197 रुपये

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारने 5,197 रुपये प्रति ग्रॅम दर जाहीर केला आहे. गुंतवणूकदार अगदी एक ग्रॅम सोने खरेदी करुन या योजनेत सहभागी होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

लगेचच 500 रुपयांचा नफा

सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट् आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्‍या आणि पैसे भरणार्‍या गुंतवणूकदारांना इश्यू किंमतीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट दिली जाईल. म्हणजेच 10 ग्रॅम खरेदी केल्यास 500 रुपयांचा त्वरीत फायदा होईल. गुंतवणूकदारांना सहामाही आधारावर निश्चित किंमतीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज दिले जाईल.

1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंत सोने खरेदी करा

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत, सरकार गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने हातात देत नाही. परंतु सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो. तर संस्थांना कमाल 20 किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवरील परतावा ही चांगला मिळतो. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांची इच्छा असल्यास, ते 5 व्या वर्षानंतर बाँडमधून बाहेर पडू शकतात.

सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय

सोन्यात गुंतवणुकीचे (Gold Investment) अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. भारतीयांचे सुवर्णवेड जगप्रसिद्ध आहे. चीन नंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने आयातदार आहे. किमतींतील अस्थिरता पाहता बाजारातील तज्ज्ञ आता सोन्यात हळूहळू आणि विविध पर्यायांसह गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. भारतात सोन्यात गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत ज्यांचा वापर केला जाऊ शकतो. साधारणपणे गुंतवणुकीचे तीन भाग केले जाऊ शकतात ज्यात सॉलिड सोने (Solid Gold) , पेपर सोने (Paper Gold) आणि डिजिटल सोने (Digital Gold) यांचा समावेश आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.