RBI News on 2000 Note : 2000 रुपयांच्या नोटेची ‘घरवापसी’! मग नागरिकांनी आता काय करावे

RBI News on 2000 Note : दुसऱ्यांदा नोटबंदी करण्याचा इतिहास मोदी सरकारने स्वतःच्या नावावर नोंदवला गेला आहे. दुसऱ्या नोटबंदीमुळे नागरिकांना आता काय करावे लागेल..

RBI News on 2000 Note : 2000 रुपयांच्या नोटेची 'घरवापसी'! मग नागरिकांनी आता काय करावे
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 7:58 PM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अचानक 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली. यापूर्वी पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता अचानकच नोटबंदीचा (Demonetisation) निर्णय घेतला होता. RBI याविषयीचे एक प्रसिद्धी पत्र जारी केले आहे. त्यात 2000 रुपयांची नोट व्यवहारातून बाहेर करण्याचे जाहीर करण्यात आले. दुसऱ्यांदा नोटबंदी करण्याचा इतिहास मोदी सरकारने स्वतःच्या नावावर नोंदवला गेला आहे. आता दोन हजारांच्या नोटा तुमच्याकडे असतील तर तुम्ही काय करायला हवे? त्यासाठी आरबीआयने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत का? नागरिकांना आता काय करावे लागेल?

आता नागरिकांनी काय करावे

  1. सोप्या शब्दात नोटा चलनातून बाहेर करण्यात आल्या आहेत
  2. या नोटा बंद करण्यात आल्या नाहीत
  3. हे सुद्धा वाचा
  4. या नोटांना हळूहळू व्यवहारातून संपूर्णपणे बाहेर करण्यात येईल
  5. नागरिकांना त्यांच्याकडील 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील
  6. एका वेळी ग्राहकांना 20,000 रुपयांपर्यंतचं या नोटा जमा करता येतील
  7. या 23 मे पासून नागरिकांना केंद्र सरकारच्या बँकेत या नोटा जमा करता येतील

आकडेवारी काय सांगते

  1. RBI च्या अहवालानुसार, 31 मार्च 2022 पर्यंत 2,000 रुपयांच्या (2000 Rupee note) एकूण 214.20 कोटी नोटा चलनात होत्या
  2. एकूण नोटांच्या हे प्रमाण 1.6% आहे. मूल्यानुसार एकूण 4,28,394 कोटी रुपयांच्या नोटा व्यवहारात
  3. इतक्या प्रमाणात नोटा असूनही त्या चलनात, व्यवहारात न दिसल्याने नागरिकांना पूर्वीच बंद होण्याची आशंका

कधी आली पहिल्यांदा नोट नोटबंदीनंतर 2017 मध्ये आरबीआयने 2000 रुपयांची नोट चलनात आणली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नोट मुद्रण प्राधिकरण लिमिटेडने 2000 रुपयांच्या नोटेची छपाई नोटबंदी होण्याच्या 2.5-3 महिन्यापूर्वीच सुरु केली होती. त्यावेळी 500 रुपयांची नोट छापण्यात आली नव्हती.

आरबीआयचा अहवाल RBI च्या वार्षिक अहवालानुसार, 31 मार्च 2022 रोजीच्या आकडेवारीवरुन, 2,000 रुपयांच्या (2000 Rupee note) एकूण 214.20 कोटी नोटा चलनात आहेत. एकूण चलनाचा हा आकडा 1.6% आहे. त्यांचे मूल्य 4,28,394 कोटी रुपये आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा असूनही त्या मात्र व्यवहारातून का गायब झाल्या, हा खरा प्रश्न आहे

नकली नोटा दरम्यान ज्या वर्षी 2,000 रुपयांची नोट केंद्र सरकारने व्यवहारात आणली. त्या वर्षी 2,000 रुपयांच्या 2,272 नकली नोटा पकडण्यात आल्या. तर 2017 मध्ये ही संख्या 74,898 इतकी झाली. 2018 मध्ये 2,000 रुपयांच्या 54,776 नकली नोटा सापडल्या होत्या.

2019 मध्ये 2,000 रुपयांच्या 90,566 नकली नोटा सापडल्या. तर पुढील वर्षी तर नकली नोटांनी सर्व रेकॉर्ड मोडून काढले. 2020 मध्ये 2,000 रुपयांच्या 2,44,834 नोटा सापडल्या होत्या. लोक मोठ्या प्रमाणात 2,000 रुपयांच्या नोटांचा गैर वापर करत आहे. त्यासाठी तर त्या दडवून ठेवण्यात येत नाही ना, असा एक मतप्रवाह आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.