AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसे कमवण्यासाठी शहरात धाव कशाला? गड्या आपला गावच बरा, घरबसल्या छापा नोटा, असा कमवा 55 हजार महिना

Money Making Tips : शहरातील नोकरीला आणि धावपळीच्या जीवनाला कंटाळाला असला तर गावात, निम शहरात तुम्ही सुद्धा कमाई करून जगू शकता. छोट्या-मोठ्या व्यवसायातून कमाई होईलच, पण गावाकडं निसर्गाच्या सान्निध्यात तुम्हाला आरोग्य सांभाळता येईल. या उद्योग येतील कामी

पैसे कमवण्यासाठी शहरात धाव कशाला? गड्या आपला गावच बरा, घरबसल्या छापा नोटा, असा कमवा 55 हजार महिना
गावाकडेच सुरू करा उद्योगाचा श्रीगणेशा
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 3:27 PM

शहरात राहत असाल आणि गाव जवळ करायचं असेल. अथवा गावातूनच उद्योग-व्यवसायाला सुरूवात करायची असेल तर हे उद्योग तुमच्या उपयोगी येऊ शकतात. या उद्योगातून तुम्ही कमाई करू शकता. या घरगुती स्टार्टअप्सपासून तुम्ही उद्योगाचा श्रीगणेशा करू शकता. त्यातून साधारणपणे 40 ते 55 हजारादरम्यान कमाई होऊ शकते. पण कोणत्या उद्योगासाठी जसं नियोजन, स्वयंशिस्त, कल्पकता आणि मेहनत घेण्याची गरज असते. तोच कित्ता तुम्हाला पण गिरवावा लागेल.

पीठाची आधुनिक चक्की

गावात पूर्वी पीठाच्या गिरणीची एक खास धून ऐकू यायची, त्यानंतर पीठाच्या गिरणीत अनेक बदल झाले. निम शहर असो वा गाव प्रत्येक जण आजही गव्हासह ज्वारी वा इतर धान्य हे दळून आणणेच पसंत करतो. पॅकेटबंद पीठाला अजूनही तेवढा प्रतिसाद नाही. त्यामुळे आता आधुनिक पीठाच्या चक्कीच्या माध्यमातून हा व्यवसाय करता येईल.

हे सुद्धा वाचा

डेअरी व्यवसाय

सध्या सर्वाधिक चालणारा उद्योग म्हणजे डेअरी व्यवसाय आहे. या व्यवसायात स्पर्धा असली तरी गुणवत्ता असलेल्या ठिकाणी ग्राहक दोन पैसे अधिक मोजून उत्पादन विकत घेतो. तुमच्या व्यवसायामुळे गायी-म्हशीचा व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईलच. पण ग्राहकांना पण फायदा होईल. दूधापासून ते इतर उत्पादनांची विक्री करता येईल. स्वतःचे उत्पादन, ब्रँड सुरू करता येईल.

कपड्याचा व्यवसाय

सध्या अनेक लोकल ब्रँडची चलती आहे. त्यात एकदम हटके लूकचे कपडे सध्या भाव खाऊन जात आहेत. फॅशनची माहिती असेल, बदलत्या ट्रेंडची माहिती असेल तर चांगला स्पॉट निवडून तुम्ही चांगलं उत्पन्न मिळवू शकता. इतकेच नाही तर तुमच्या नावाचा एक ब्रँड पण सुरू करू शकता. त्याची फ्रँचाईज देऊ शकता.

रिटेल स्टोर

मॉलचे आकर्षण केवळ शहरी भागतच नाही तर ग्रामीण भागात पण आहे. तुम्ही तालुका, बाजार गावाच्या ठिकाणी आधुनिक रिटेल स्टोर सुरू करू शकता. गावात ही आता अनेक ब्रँड पोहचले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या रिटेल सामानाची एक दुकान सुरू करू शकता. हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो.

संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच.
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही.
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला.
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....