AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mutual Fund : उतारवयात हवी मजबूत परताव्याची काठी, तर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ठरेल साथी..

Mutual Fund : उतारवयात म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरू शकते..

Mutual Fund : उतारवयात हवी मजबूत परताव्याची काठी, तर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ठरेल साथी..
ही गुंतवणूक ठरेल फायदेशीरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 8:43 PM

नवी दिल्ली : भारतात ज्येष्ठ नागरिकांच्या (Senior Citizen) सर्वच बचत योजनांवर (Saving Scheme) अधिक व्याज आणि इतर सुविधा मिळतात. तरीही ज्येष्ठ नागरिकांकडे गुंतवणुकीसाठी (Investment) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. निवृत्त व्यक्ती (Retire) हुशारीने गुंतवणूक करतात. कारण त्यांनी पै न पै जोडून मोठा निधी उभारलेला असतो. त्यांच्या आयुष्याची पुंजी त्यांना उतारवयात उपयोगी पडते.

Senior Citizen जोखीमयुक्त योजनांकडे पाहत ही नाहीत. या योजनांमध्ये तगडा परतावा मिळत असताना, ज्येष्ठ नागरिकांना मात्र या योजनांमध्ये गुंतवणुकीची कोणतीच इच्छा नसते. अर्थात त्यामागे भविष्याची चिंता असते.

म्युच्युअल फंडविषयी ही असाच मोठा गैरसमज वयोवृद्धांमध्ये आहे. पण या योजनांमधील फायद्याचे गणित त्यांनी समजून घेतल्यास त्यांचा मोठा फायदा होऊ शकतो. काही प्रमाणात रिस्क असली तरी ही योजना फायदेशीर ठरते.

हे सुद्धा वाचा

पारंपारिक गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक विना जोखिमेची असली तरी त्यातील व्याजदराचा विचार करता, परतावा अत्यंत माफक मिळतो. त्याउलट जोखिम असली तरी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतो.

महागाई आणि औषधांचा खर्च पाहता, ज्येष्ठांना म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते. कारण यामधील परतावा महागाईला मात देऊ शकते. महागाईला मात देण्यासाठी पारंपारिक योजना सक्षम नाहीत.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा पैसा हा शेअर बाजार, विविध बाँड, ईटीएफ आणि इतर योजनांमध्ये गुंतवितात. सहाजिकच त्यावर जोखिम असते. त्यामुळे पद्धतीशीर गुंतवणूक योजना (SIP) गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरते.

प्रत्येक म्युच्युअल फंड हा एका विशिष्ट धोरणानुसार काम करतो. त्यानुसार परतावा देतो. यामधील परतावा हा बाजाराच्या आधीन असतो. त्यावर निर्धारीत परतावा मिळत नाही.

ज्येष्ठ नागरिकांसाठी शॉर्ट टर्म डेट फंड अथवा शॉर्ट टर्म बाँडमधली गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते. यामध्ये जोखिम अत्यंत कमी असून परतावा ही चांगला मिळतो. बँकेतील एफडी पेक्षा हा परतावा उत्तम असतो. काही म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कॅपिटल गेन टॅक्सतंर्गत येते.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.