Monthly Income FD Scheme: सर्वाधिक व्याज दर देणाऱ्या पाच एफडींबद्दल जाणून घ्या 

मंथली इनकम फिक्स्ड डिपॉझिट ही बँकिंग क्षेत्रातील एक महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना आहे. जे लोक बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट योजनांमध्ये पैसे गुंतवतात त्यां सर्वांनाच या योजनेबद्दल माहित असते. या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे तुम्हाला दर महिन्याला तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळत राहाते.

Monthly Income FD Scheme: सर्वाधिक व्याज दर देणाऱ्या पाच एफडींबद्दल जाणून घ्या 
सरकार तुमच्या खात्यात 2,67,000 रुपये जमा करत आहे ! सावध व्हा, तुमची फसवणूक होतेय....Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 7:48 AM

बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट योजनांबद्दल आपल्या सर्वांनाच माहित आहे. परंतु तुम्हाला मंथली इनकम फिक्स्ड डिपॉझिट (Monthly Income FD Scheme) योजनांबद्दल माहित आहे का? तुमच उत्तर हो असेच असेल आम्हाला त्याबद्दल खात्री आहे. कारण मंथली इनकम फिक्स्ड डिपॉझिट ही बँकिंग क्षेत्रातील एक महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना आहे. जे लोक बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट योजनांमध्ये पैसे गुंतवतात त्यां सर्वांनाच या योजनेबद्दल माहित असते. या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे तुम्हाला दर महिन्याला तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळत राहाते. तुम्ही जेव्हा नोकरी करत असतात, तेव्हा तुम्हाला जसा दर महिन्याला पगार मिळतो. तसेच या योजनेमध्ये तुम्ही बँकेत केलेल्या गुंतवणुकीवर दर महिन्याला व्याज मिळते. तसेच तुमचे जर एखाद्या बँकेत सेव्हिंग खाते (Savings account) असेल तर त्या खात्यावर मिळणाऱ्या पैशांपेक्षा जास्त व्याज तुम्हाला या योजनेमध्ये मिळते. ज्येष्ठ नागरिकांना तर आणखी अतिरिक्त व्याज देण्याची सुविधा अशाप्रकारच्या एफडीमध्ये असते. सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी तुम्ही तुमचे पैसे या योजनेत गुंतवू शकता. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, योजनेचा कालावधी (FD Maturity) पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला ही रक्कम परत मिळते.

5 सर्वात फायद्याच्या एफडी

सर्वाधिक फायदा देणाऱ्या एफडी योजनेबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये एसबीआय बँकेची एन्युटी फिक्स्ड डिपॉझिट योजना, तुम्ही या योजनेत पैसे गुंतवल्यास 5.40 टक्के व्याज दर तुमच्या गुंतवणुकीवर दिला जातो. एचडीएफसीच्या मंथली इनकम फिक्स्ड डिपॉझिट योजनेवर तुम्हाला 5.50 टक्के व्याज देण्यात येते. आयसीआयसीआय बँकेचीच आणखी एक योजना आहे, जी स्कीम मंथली इनकम फिक्स्ड डिपॉझिट नावाने ओळखली जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 5.35 टक्के व्याज दर मिळतो. ऍक्सिस बँकेंने देखील आपल्या ग्राहकांसाठी मंथली फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरू केली आहे. ऍक्सिस बँकेत या योजनेंतर्गत पैसे गुंतवल्यास तुम्हाला 5.75 टक्के व्याज दराने पैसे दिले जातात. तुम्ही जर युनियन बँकेत या योजनेतंर्गत पैसे गुंतवल्यास तुम्हाला 5.60 टक्के व्याज दर दिला जातो. या योजनेंतर्गत पैसे गुंतवल्यास दर महिन्याला व्याजाच्या स्वरुपात तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवता होते. व तुमची गुंतवणूक देखील सेफ राहाते.

मंथली इनकम एफडी स्कीमचे फायदे

मंथली इनकम एफडी स्कीमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पगाराप्रमाणेच दर महिन्याला व्याज तुमच्या बँकेत जमा होत राहाते, त्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षीत राहाते. या योजनेवर बँकेच्या इतर स्कीमपेक्षा व्याजदर अधिक असतो. एफडीचा कालावधी हा सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंत असल्यामुळे तुम्ही तुमच्या सोईनुसार एफडीचा कालावधी निश्चित करू शकता. तसेच एफडी तारण ठेवून लोन देखील घेता येते.

संबंधित बातम्या

EPF आणि PPF मध्ये नेमका काय फरक? दोघांपैकी जास्त Returns कशावर? जाणून घ्या!

Tax Saving, FD की पोस्ट ऑफिस TD, ग्राहकांना कोणत्या डिपॉझिटवर अधिक व्याज? जाणून घ्या!

ठोक इंधन विक्रेत्या कंपन्यांनी पेट्रोलचे दर 25 रुपयांनी वाढवले; किरकोळ विक्रेत्यांवरील दबाव वाढला, भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.