ही सवय बनवेल तुम्हाला लखपतीच नाही तर करोडपती, दरमहिन्याला एक हजारांची बचतीतून व्हा करोडपती! 

म्युच्यअल फंडात दरमहिन्याला केलेली एक हजार रुपयांची बचत तुम्हाला लखपतीच नाही तर करोडपती बनवू शकते. त्यासाठी नियमित बचतीची सवय तुम्हाला ठेवावी लागेल आणि बाजाराने तुम्हाला साथ दिल्यास तुम्ही करोडपती ही होऊ शकता

ही सवय बनवेल तुम्हाला लखपतीच नाही तर करोडपती, दरमहिन्याला एक हजारांची बचतीतून व्हा करोडपती! 
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 9:42 AM

गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काही कमी जोखमीचे तर काही जास्त जोखमीचे. जिथे धोका कमी तिथे सुरक्षित (Safe) उत्पन्नाची हमी मिळते. पण या पारंपरीक पद्धतीत कमी व्याजदराने परतावा मिळतो. पण अधिक परतावा मिळवायचा असेल तर तुम्हाला रिस्क घ्यावी लागते. सध्या म्युच्युअल फंडाकडे गुंतवणुकदारांचा (Investment) ओढा वाढला आहे. म्युच्युअल फंड एसआयपीच्या (mutual fund SIP investment) अनेक योजना 12 ते 20 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहेत.

एसआयपीमध्ये दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला 30 वर्षांत वार्षिक 20 टक्के परताव्याने करोडपती बनवू शकते. भविष्यातील आर्थिक गरजा लक्षात घेऊन प्रत्येकजण चांगल्या परतावा पदरात पाडण्यासाठी गुंतवणूक पर्याय शोधत असतो. त्यासाठी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक हा चांगला पर्याय ठरू शकतो. केवळ 1000 रुपयांची पद्धतशीर गुंतवणूक योजनेआधारे केलेली दीर्घ गुंतवणूक तुम्हाला लक्षाधीश बनवते तर गुंतवणूक रक्कम वाढविल्यास कोट्याधीश बनविते.

गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, बाजारातील अस्थिरता लक्षात घेता गुंतवणूकदार एकरकमी पैसे ठेवणे टाळत आहेत. त्याऐवजी ते एसआयपी (SIP) द्वारे छोट्या गुंतवणूकीला प्रोत्साहन देत आहेत. तुम्हालाही ‘एसआयपी’च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर दरमहा फक्त 1000 रुपयांची बचत करून तुम्ही करोडपती बनू शकता. बँक आणि टपाल खात्यातील योजनेत रक्कम गुंतवल्यास ही रक्कम इतक्या वेगाने वाढू शकत नाही. एक हजार रुपयांची महिन्याला बचत प्रत्येकाला सहज साध्य होऊ शकते. 20 हजार रुपये महिना कमाविणा-या व्यक्तीलाही एक हजारांची बचत करता येईल. थोडी जोखीम पत्करुन म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास लखपती आणि करोडपती होण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही

तुम्ही सुरक्षित परताव्याच्या, मोबदल्याच्या विचारात असाल तर तुम्हाला बँक, टपाल खात्याची मुदत ठेव योजनेचा विचार करता येईल. परंतू, यातील परतावा हा म्युच्युअल फंडातील उत्पन्नापेक्षा नगण्य म्हणावा असा असेल. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसोबतच तुम्ही दरमहा एक हजार रुपये म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये गुंतवल्यास 20-30 वर्षातील परताव्याचे आकडे तुमचे डोळे विस्फारतील.

पॉकिटमनी म्हणून मुलंही एक हजार रुपयांची दर महा बचत करु शकता. गाव असो वा शहर येथील नागरिकांना दरमहा एक हजारांची बचत करता येऊ शकते. काही तज्ज्ञांच्या मते, महागाई दर पाहता, एक हजार रुपयांच्या बचतीतून काय साध्य होईल. परंतु, बचतीची सुरुवात ही छोट्या रक्कमेपासूनच करता येते आणि हा हा म्हणता ही रक्कम डोंगराऐवढी होते तर त्यातील परतावा आश्चर्यकारक असतो.

छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही मोठा परतावा साध्य करु शकता. दरमहा केवळ एक हजार रुपयांच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून तुम्ही करोडपती होऊ शकता. त्यामुळे या नवीन वर्षात 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून दोन ते तीन दशकात तुम्हाला जोरदार परतावा, मोबदला मिळू शकतो. जर तुम्ही दरमहा एक हजार रुपयांची एसआयपी केली तर 20 वर्षांत तुम्हाला 12 टक्के परतावा गृहित धरला तर 20 वर्षानंतर एकूण 9,99,148 म्हणजे जवळपास 10 लाख रुपये परत मिळतील. या 20 वर्षात एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून 2 लाख 40 हजार रुपये जमा होतील. जर या गुंतवणुकीवर 15 टक्के रिटर्न मिळाले तर 15 लाखांपेक्षा जास्त रक्कम 15,15,995 रुपेय मिळतील. 20 टक्के परतावा मिळाल्यास तुमच्यासारखा भाग्यवंत दुसरा नसेल, दर महिना एक हजार रुपये एसआयपी 20 वर्षांत तुम्हाला 31 लाख 61 हजार 479 रुपये परतावा देईल.

ही गुंतवणूक 30 वर्षांसाठी केल्यास वाढीव दहा वर्षांचा हिशेब तुम्हाला थक्क करणारा असेल. दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक 12 टक्के परतावा लक्षात घेऊन एकूण 35 लाख 29 हजार 914 रुपये मिळतील. तर 15 टक्के व्याजदराने 70 लाख रुपये परतावा मिळेल आणि 20 टक्के व्याजदराने 30 वर्षांतील परताव्याची रक्कम तुमचे डोळे विस्फारेल. तुम्हाला तब्बल 2 कोटी 33 लाख 60 हजार 802 रुपये मिळतील. या 30 वर्षांत तुम्ही एकूण गुंतवणूक 3 लाख 60 हजार रुपये गुंतवणूक कराल. तर विचार करा ही गुंतवणूक किती फायद्याची ठरेल ते.

संबंधित बातम्या : 

खुशखबर!, 100 पेटीएम भाग्यवंतांना एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार मोफत

भारतातील बेरोजगारीचे वास्तव समजून घ्या एका क्लीकवर

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.