PPF Account : ही एकच ट्रिक देईल रॉकेट भरारी! पीपीएफमध्ये करा एवढाच बदल, व्हाल एकदम मालामाल

PPF Account : पीपीएफ खात्यातून अधिक परतावा मिळविता येतो. पण त्यासाठी एक युक्ती वापरावी लागते, ही युक्ती आहे संयमाची, ती कशी वापरायची आणि त्यातून कसा फायदा मिळतो, ते पाहुयात..

PPF Account : ही एकच ट्रिक देईल रॉकेट भरारी! पीपीएफमध्ये करा एवढाच बदल, व्हाल एकदम मालामाल
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 8:51 PM

नवी दिल्ली : तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत (Public Provident Fund-PPF) मध्ये गुंतवणूक करत असाल, तुम्हाला अधिकचा फायदा मिळू शकतो. हा अधिकचा परतावा पदरात पाडून घेण्यासाठी एक युक्ती वापरावी लागते. पीपीएफ हा गुंतवणुकीचा सर्वात मोठा पर्याय आहे. अनेक गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणुकीसाठी अग्रेसर असतात. या योजनेतील गुंतवणुकीवर केंद्र सरकार (Central Government) हमी घेते. या योजनेतील गुंतवणूक E-E-E या श्रेणीत ठेवण्यात आली आहे. म्हणजे या योजनेतील गुंतवणूक, व्याज, म्यॅच्युरिटी रक्कम सर्वच करमुक्त (Tax Free) ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना भलामोठा फायदा मिळतो. त्यांना चांगला परतावा तर मिळतोच पण कर सवलतीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष फायदा ही मिळविता येतो. ही युक्ती आहे संयमाची, ती कशी वापरायची आणि त्यातून कसा फायदा मिळतो हे पाहणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

ही वापरा युक्ती PPF खात्यातील गुंतवणूक तुम्ही 15 वर्षानंतर 5-5 वर्षांकरिता ही योजना वाढवू शकता. त्यासाठी पीपीएफने काही शर्ते आणि नियम तयार करण्यात आले आहे. ही एक ट्रिक आहे. यामाध्यमातून तुम्ही पुढील दहा वर्षांत अजून जास्त परतावा मिळू शकता. त्यासाठी संयम आणि गुंतवणुकीत सातत्य ठेवावे लागेल. त्यानंतर मुळ रक्कमेवर चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा होईल. दीर्घकालीन गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना मोठा फायदा होतो. त्यांना कर सवलत मिळत असल्याने एकाच गुंतवणुकीवर डबल फायदा होतो.

रक्कम व्याजमुक्त पत्नी, पतीच्या नावे पीपीएफ खाते उघडाल, तेव्हा दोन्ही खाते करमुक्त असतील. परंतु, प्राप्तिकर कायद्याच्या कलम 64 अंतर्गत पत्नीला दिलेली रक्कम अथवा भेट, उत्पन्न करपात्र ठरु शकते. पीपीएफमध्ये मात्र याविषयीची कुठलीही अडचण येत नाही. गुंतवणूकदारांना मोठा फायदा होतो. त्यांना या नियमाचा अडसर येत नाही.

हे सुद्धा वाचा

PPF वरील व्याजदर पीपीएफ खात्यात जोडप्यांना मोठा फायदा मिळतो. जर पती-पत्नीने खाते उघडले तर दोन्ही खाते मिळून मोठी रक्कम जमा होते. सध्या एप्रिल ते जून या तिमाहीत पीपीएफवर 7.1 टक्का व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

कालावधी वाढीचे नियम

  1. गुंतवणूकदारांना PPF खात्यात कालावधी वाढविता येतो.
  2. खातेदारांना कालावधी वाढविण्यासाठी एक अर्ज द्यावा लागेल.
  3. खातेदारांना हा अर्ज कालावधी संपण्याच्या एक वर्षाअगोदर द्यावा लागेल.
  4. खात्याचा कालावधी वाढविल्यानंतर तुम्ही 5 वर्षांसाठी वार्षिक 500 रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल.
  5. तुम्ही कालावधी वाढवल्यानंतर त्यात रक्कम जमा न केल्यास तुमचे खाते बंद होईल.
  6. कालावधी वाढवून त्यात रक्कम जमा न करणे महागात पडेल, तुम्हाला दंड द्यावा लागेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.