पॅकेजिंग क्षेत्रातील ‘या’ कंपनीने वर्षभरात दिला 100 टक्क्यांहून अधिक परतावा, तज्ज्ञांकडून शेअर खरेदीचा सल्ला
पॅकेजिंग क्षेत्रात काम करणाऱ्या मोल्ड - टेक पॅकेजिंग (Mold - Tech Packaging) या कंपनीने परताव्याच्या (Refund) बाबतीत अनेक कंपन्यांना मागे टाकले आहे. गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने (Shares) तब्बल 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
नवी दिल्ली : पॅकेजिंग क्षेत्रात काम करणाऱ्या मोल्ड – टेक पॅकेजिंग (Mold – Tech Packaging) या कंपनीने परताव्याच्या (Refund) बाबतीत अनेक कंपन्यांना मागे टाकले आहे. गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने (Shares) तब्बल 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरर्समध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. मोल्ड -टेक पॅकेजिंग कंपनी पेंट, वंगण एफएमजी आणि खाद्य उद्योग क्षेत्रातील कंपन्यांसाठी पॅकेजिंगचे काम करते. या कंपनीच्या शेअरर्समध्ये गेल्या वर्षभरात 115 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र चालू वर्षात या कंपनीच्या स्टॉकमध्ये काही प्रमाणात घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. एक जानेववारी 2022 पासून ते आतापर्यंत या कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे आठ टक्क्यांनी घसरण झाली आहे. याच मुख्य कारण म्हणजे सध्या शेअरमार्केटवर असलेला दबाव हे सांगण्यात येत आहे. मात्र ही स्थिती फार काळ राहणार नसून पुन्हा एकदा या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
पुढील तीन वर्ष शेअर तेजीत राहण्याचा अंदाज
ब्रोकरेज फर्म सेंट्रम ब्रोकिंगच्या अंदाजानुसार या कंपनीच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी दिसू शकते. चालू आठवड्यात शुक्रवारी व्यवहार बंद झाला तेव्हा या कंपनीचा शेअर 1.80 टक्क्यांनी घसरून प्रति शेअर 725.70 रुपयांवर आला आहे. सध्या या कंपनीच्या शेअरमध्ये थोड्याफार प्रमाणात घसरण दिसत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे सध्या शेअरमार्केटवर दबाव आहे. मात्र येत्या तीन वर्षांपर्यंत या शेअरमध्ये तेजी राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
पॅकेजिंग क्षेत्रामधील अद्यावत कंपनी
या कंपनीचे मुख्य वैशिष्ट म्हणजे पॅकेजिंग क्षेत्रामधील ही एक अद्यावत कंपनी आहे. कंपनीकडे स्व:ताच्या मालकीचे अद्यावत असे इन-हाउस टूल रूम, डिझाईन स्टुडिओ, रोबोट मॅन्युफॅक्चरिंग आणि लेबल मेकिंग या सारख्या सुविधा आहेत. कंपनीचा बिझनस वाढवण्यासाठी या गोष्टींचा कंपनीला मोठ्याप्रमाणात उपयोग होत आहे. बिझनस चांगला असल्याने परिणामी कंपनीच्या शेअरमध्ये देखील तेजी दिसून येत आहे.
संबंधित बातम्या
Cryptocurrency Prices : कितीही लावा टीडीएस आणि कर, Bitcoin आणि Ethereum चा कायम वाढीचा दर
4.5 लाखांची Datsun कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
आरबीआयचं अर्थकारण: रिझर्व्ह बँकेचं पतधोरण एप्रिलपर्यंत ‘जैसे थे’; अमेरिकन संस्थेचा अहवाल