Mukesh Ambani | मुकेश अंबानींनी खरेदी केला न्यूयॉर्कमधील लग्झरी हॉटेल; किंमत वाचून व्हालं थक्क!
गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांनी लंडनमध्ये एक आयकॉनिक हॉटेल खरेदी करून सगळ्यांना धक्का दिला. अंबानी रिटेल मार्केटमध्ये गुंतवणूक करत होते. आता हॉस्पिटीलीची क्षेत्रातही त्यांनी गुंतवणूक केली आहे.
देशातील सर्वात श्रीमंत आणि अरबपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी वर्षभरात दुसरा हॉटेल खरेदी केला. रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड ((Reliance Industries Limited)ने न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित लग्झरी हॉटेल मेंडारीन ओरिएंटल (Mandarin Oriental) ला 728 कोटी (9.81 कोटी डॉलर) मध्ये खरेदी केल्याची घोषणा केली. 2003 मध्ये स्थापित झालेले मेंडारीन ओरिएंटल न्यूयॉर्कच्या 80 कोलंबस सर्कल भागातील एक प्रतिष्ठित लग्झरी हॉटेल आहे. हे हॉटेल सेंट्रल पार्क आणि कोलंबस सर्कलजवळ आहे. गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये आयकॉनिक कंट्री क्लब आणि गोल्फ रिझॉर्ट स्टोक पार्कला 57 मिलियन पाउंड म्हणजे 592 कोटी रुपयांत खरेदी केले होते.
न्यूयॉर्कमधील लग्झरी हॉटेलपैकी एक
कंपनीने स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले, रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची मालकी असलेली सहायक कंपनी रिलायंस इंडस्ट्रियल इंवेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेड (आरआईआईएचएल) ने जवळपास 9.81 कोटी डॉलरच्या इक्विटीवर कोलंबस सेंटर कॉर्पोरेशनची संपूर्ण रक्कम अधिग्रहित करण्यासाठी एक करार केलाय. ही कामॅन आयलंड्समध्ये सहभागी एक कंपनी आहे. मेंडारीन ओरिएंटल न्यूयॉर्कमध्ये 73.37 टक्के भागिदारीची अप्रत्यक्ष मालकी आहे. मेंडारीन ओरिएंटल न्यूयॉर्क शहरातील प्रतिष्ठित लग्झरी हॉटेलपैकी एक आहे. रिलायंसने म्हटले, याचे व्यवहार मार्च 2022 च्या शेवटपर्यंत होण्याचा अंदाज आहे.
हॉटेल इंडस्ट्रीत अंबानींची आगेकूच
रिलायंस का इस समय मुंबई में कन्वेंशन सेंटर, होटल और प्रबंधित आवास विकसित करने के अलावा ईआईएच लिमिटेड में निवेश है. RIIHL बाकी 26.63 फीसदी का अधिग्रहण करेगा, जो अप्रत्यक्ष 73.37 फीसदी हिस्सेदारी के अधिग्रहण के लिए उपयोग किए गए समान मूल्यांकन के आधार पर होगा. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आता हळूहळू हॉटेल इंडस्ट्रीत पाय रोवू लागले आहेत. यापूर्वी त्यांनी लंड़नमधील कंट्री क्लब आणि गोल्फ क्लब आणि गोल्फ रिसॉर्ट स्टोक पार्क खरेदी केला होता. स्टोक पार्क हे युरोपचे सर्वात सुंदर गोल्फ कोर्स आहे. हॉलिवूड चित्रपटांचे शुटिंग येथे होते. बकींघमशायर येथील स्टॉक पार्क 300 एकरमध्ये पसरले आहे. येथे राहण्यायोग्य 49 बेडरुम्सशिवाय स्पा, स्वीमिंग पुल, फिटनेस क्लब, जीम आदी सुविधा आहेत. स्टॉक पार्कचा इतिहास 900 वर्षे जुना आहे. परंतु, 1908 पर्यंत याचा वापर खासगी राहण्यासाठी केला जात होता. या पार्कला James Wyatt यांनी डिझाइन केलंय.