Nag Panchami 2022: नागपंचमीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये; जाणून घ्या, पूजेची तिथी आणि पद्धती!

यावेळी नागपंचमीचा सण 02 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. हा दिवस मंगळवारी येत आहे. या दिवशी नागांची पूजा करून व्रत ठेवल्याने पुण्य प्राप्ती होते. जाणून घेऊया या दिवशी काय करावे आणि काय करू नये.

Nag Panchami 2022: नागपंचमीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये; जाणून घ्या, पूजेची तिथी आणि पद्धती!
Nag PanchamiImage Credit source: google
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 5:00 PM

हिंदू धर्मात नागपंचमीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण दरवर्षी हिंदू कॅलेंडरमधील पाचवा महिना श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा नागपंचमीचा सण (Nagpanchami festival) मंगळवार, 2 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. हा सण साधारणपणे तीजच्या दोन दिवसांनी येतो. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख-शांती (Happiness and peace at home) राहते, असा समज आहे. अनेकजण या दिवशी उपवासही करतात. या दिवशी गरजूंना दान (Donate to the needy) करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी घरात मातीपासून सापाच्या मूर्तीही बनवल्या जातात. नागदेवतेला फुले, मिठाई आणि दूध अर्पण केले जाते. या दिवशी अनेक ठिकाणी जत्राही भरतात. नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक रीतीभाती पाळल्या जातात. जाणून घ्या, या दिवशी काय करावे आणि काय करू नये.

नागपंचमी शुभ मुहूर्त

यावेळी नागपंचमी मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 रोजी आहे.

नागपंचमी तिथी 02 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 05:13 वाजता सुरू होईल.

हे सुद्धा वाचा

नागपंचमी तिथी 03 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे 05:41 वाजता समाप्त होईल.

पूजेची शुभ वेळ – सकाळी 06:05 ते 08:41 पर्यंत.

नागपंचमीच्या दिवशी काय करावे

नागपंचमीच्या दिवशी उपवास ठेवावा. या दिवशी उपवास केल्याने साप कधीच दंश करत नाही, असे मानले जाते.

नाग देवतांच्या मूर्तीला दूध, मिठाई आणि फुले अर्पण करा.

नाग पंचमी मंत्राचा जप करा.

ज्यांच्या कुंडलीत राहू-केतू भारी आहेत त्यांनी या दिवशी व्रत ठेवावे.

या दिवशी काय करू नये

नागपंचमीच्या दिवशी माती नांगरू नये. त्यामुळे सापांना इजा होण्याचा धोका असतो.

या दिवशी झाडे तोडू नका. यामध्ये लपलेल्या सापांना इजा होऊ शकते.

शिवणकामाशी संबंधित कोणतेही काम करू नका कारण ते अशुभ मानले जाते.

नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यांमध्ये अन्न शिजवू नका किंवा लोखंडी भांड्यात अन्न खाऊ नका.

या दिवसाचे महत्त्व

असे मानले जाते की, सापांसाठी केलेली कोणतीही पूजा नाग देवतांपर्यंत पोहोचते. म्हणूनच लोक त्या दिवशी सर्पदेवतांच्या रूपात जिवंत सापांची पूजा करतात. हिंदू धर्मात सापांना सर्प देवता म्हणून पूजनीय मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा आणि उपवास केल्याने सर्पदंशाचा धोका कमी होतो. या नागाची दुधाने स्नान करून पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते. या दिवशी अनेक लोक घराच्या मुख्य गेटवर सापाचे चित्रही काढतात.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सामान्य लोकहित लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.