रिझर्व्ह बँकेच्या नियमांत बदल, नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राईमला फटका बसणार?

Auto Debit | ऑटो डेबिट म्हणजेच तुमच्या मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे वीज, गॅस, एलआयसीचा हप्ता वा इतर ईएमआय जे तुम्ही दर महिन्याला भरता, ते बऱ्याचता तुम्ही ऑटो मोडवर टाकता. म्हणजेच, ते बिल आलं की बँक खात्यातून त्याची रक्कम आपोआप कापली जाते. यामुळे दरवेळी बिल भरण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागत नही.

रिझर्व्ह बँकेच्या नियमांत बदल, नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राईमला फटका बसणार?
ओटीटी
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 7:44 AM

मुंबई: तुम्ही नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम किंवा हॉटस्टार यासारख्या ओव्हर द टॉप म्हणजे ओटीटी माध्यमांचे ग्राहक असाल तर रिझर्व्ह बँकेच्या बदललेल्या धोरणाचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. रिझर्व्ह बँकेकडून घोषणा केलेल्या ऑटो डेबिटच्या नियमांची 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी होईल. त्यामुळे आता तुम्हाला नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम किंवा हॉटस्टारच्या सबस्क्रिप्शनचे पैसे भरण्याच्या पद्धतीत बदल करावा लागू शकतो. अर्थात हा नियम सगळ्यांसाठी सरसकट लागू होणार नाही.

ऑटो डेबिट म्हणजेच तुमच्या मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे वीज, गॅस, एलआयसीचा हप्ता वा इतर ईएमआय जे तुम्ही दर महिन्याला भरता, ते बऱ्याचता तुम्ही ऑटो मोडवर टाकता. म्हणजेच, ते बिल आलं की बँक खात्यातून त्याची रक्कम आपोआप कापली जाते. यामुळे दरवेळी बिल भरण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागत नही. मात्र यात धोका असाही असतो, की बऱ्याचदा काही बिलं जास्त येतात, जास्त रक्कम जोडलेली असते, न घेतलेल्या सुविधेचे पैसे लावलेले असतात, अशावेळी ऑटो डेबिट मोड तोट्याचा ठरतो.

त्यामुळे नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम किंवा हॉटस्टारच्या मोठ्या रक्कमेच्या सबस्क्रिप्शनचे पैसे भरताना अडचण येऊ शकते. तुमच्याकडे या तिन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मसची सबस्क्रिप्शन्स असतील आणि हे पैसे एकाच दिवशी भरावे लागत असतील तर व्यवहारात काही अडचणी येणार का, हे पाहावे लागेल.

किती रक्कमेच्या व्यवहारांसाठी ऑटो डेबिट बंधनकारक?

बँका आणि नव्या पिढीच्या देयक कंपन्यांकडून वर्षभर सुरू राहिलेल्या चालढकलीनंतर अखेर नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होत आहे. तथापि पाच हजार रुपयांपुढच्या व्यवहारासाठींच तो असल्याने केवळ मोजके व्यवहार बाधित होतील. यातून बरे आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे परिणाम संभवतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. यातून कार्डधारक ग्राहकांची पुरती गैरसोय होणार नाही. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला होता. मात्र, पाच हजारांखालचे बहुतांश व्यवहार शक्य असल्याने ग्राहकांना याचा खरंच कितपत फायदा होईल, याबाबात साशंकताच आहे.

मोफत मिळवा नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राईमचे सब्सक्रिप्शन

नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइमला स्ट्रीम करणे करमणुकीसाठी सर्वोत्तम आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का? स्ट्रीमिंगसाठी आपण एका वर्षाला किती खर्च करीत आहोत? जर आपण ओटीटी प्लॅटफॉर्मचा सब्सक्रिप्शन घेत असू, तर त्यात प्राइम, नेटफ्लिक्स, डिज्नी +हॉटस्टार आणि इतर प्लॅटफॉर्मचा समावेश असतो. अशा परिस्थितीत या सर्वांचे सब्सक्रिप्शन आपल्याला वर्षाचा 10,000 रुपये खर्च करावा लागतो. या तुलनेत हे चांगले ठरेल की तुम्ही कोणत्याही मोबाईल कंपनीचा प्रीपेड प्लान घ्यावा. या प्रीपेड प्लॅनसोबत विशिष्ट ओटीटी प्लॅटफॉर्मचे वर्षभराचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते.

संबंधित बातम्या:

1 ऑक्टोबरपासून पोस्टातील आर्थिक व्यवहाराशी संबंधित ‘या’ सहा गोष्टी बदलणार

1 ऑक्टोबरपासून हॉटेल्स, रेस्टाँरंटसच्या बिलांसाठी नवा नियम, उल्लंघन झाल्यास कारवाई

आजपासून या बँकेची ATM सेंटर्स बंद, ग्राहकांना पैसे कसे मिळणार?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.