आता जन्मदात्या बाळाचेही बनणार आधार कार्ड, काय आहे या निर्णयामागचे कारण?

आता नवजात बालकाच्या जन्मदाखल्यासोबतच त्याचे आधार कार्ड देखील बनवले जाणार आहे, मात्र इतक्या लवकर आधार कार्ड बनविण्याची गरज का पडत आहे?

आता जन्मदात्या बाळाचेही बनणार आधार कार्ड, काय आहे या निर्णयामागचे कारण?
आधार कार्ड Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 10:42 PM

मुंबई, नवजात बालकांच्या जन्मानंतर (New Born Baby) त्यांची नोंद सरकारी दस्तऐवजात येईपर्यंत त्यांचे वय 5 ते 10 वर्षे होते. त्यामुळे अनेक वेळा त्या मुलाचे नाव किंवा आई-वडिलांचे नाव, जन्मतारीख यामध्ये घोळ होतो. अशा मुलांना भविष्यात खूप त्रास सहन करावा लागतो. मात्र आता नवजात बालकांच्या जन्म प्रमाणपत्रासोबतच त्यांच्या आधार क्रमांक नोंदणीची (Aadhar card) सुविधाही उपलब्ध व्हावी, असा सरकारचा मानस आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय स्त्री रुग्णालयात संतोष व सुरेखा जाधव यांची मुलगी भावना हिचे जन्मल्यावर अवघ्या 6 मिनिटात आधार कार्ड व जन्म दाखला देण्याचे रेकॉर्ड 24 सप्टेंबर 2017 रोजी करण्यात आला, जन्मल्यावर सर्वात कमी वेळेत आधारचे हे रेकॉर्ड देशात आजही कायम आहे.

इतक्या कमी वेळेत आधार कार्ड करुन पालकांना एक प्रेरणा मिळावी व जनजागृती करण्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाने हा पुढाकार घेतला. तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एकनाथ माले हे स्वतः त्यावेळी हजर होते. भावनाचा जन्म दुपारी 12.03 ला झाल्यावर 12.09 ला तिला आधार कार्ड व जन्म दाखला रुग्णालयातून मिळाला. आधार गर्ल असलेली भावना आता 5 वर्षाची असून ती या रेकॉर्डमुळे देशभरातील माध्यमातुन प्रसिद्धीच्या झोतात आली होती. हाच उपक्रम आता इतर राज्यांमध्ये देखील राबविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

16 राज्यांत होणार सुविधा सुरू

नवजात बालकांच्या आधार क्रमांक नोंदणीसह त्यांच्या जन्म प्रमाणपत्राची सुविधा येत्या काही महिन्यांत सर्व राज्यांमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या 16 राज्यांमध्ये नवजात बालकांच्या आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. ही प्रक्रिया 1 वर्षापूर्वी सुरू झाली. आता अनेक राज्ये त्यात सामील होत आहेत. इतर राज्यातही या दिशेने काम सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

बायोमेट्रिकला वेळ लागतो

केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने येत्या काही महिन्यांत ही सुविधा सर्व राज्यांमध्ये सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.  5 वर्षापर्यंतच्या मुलांची बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही. बायोमेट्रिक डेटा संकलित केला जातो जेव्हा मूल 5 वर्षांचे असते आणि नंतर 15 वर्षांचे असते.

असे होणार रजिसस्टेशन

आता जन्म प्रमाणपत्रासह मुलाचे आधार जारी केले जातील. यासाठी UIDAI भारताच्या रजिस्ट्रार जनरलसोबत काम करत आहे. या प्रक्रियेसाठी संगणकावर आधारित जन्म नोंदणी प्रणालीची आवश्यकता असून ही सुविधा उपलब्ध असलेल्या राज्यांमध्ये सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या 16 राज्यांमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर जन्म प्रमाणपत्र जारी केले जाते तेव्हा त्याची माहिती  UIDAI प्रणालीला पाठवला जातो. यानंतर, मुलाचा फोटो आणि पत्ता यासारखे तपशील प्राप्त होताच त्याचा आधार क्रमांक तयार केला जातो.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.