New e-filing portal: नव्या टॅक्स पोर्टलमुळे करदाते हैराण; एक-दोन नव्हे तर 40 तांत्रिक अडचणी

| Updated on: Jun 21, 2021 | 9:38 AM

Income Tax Portal | या पोर्टलमध्ये थोड्याथोडक्या नव्हे तर ढीगभर तांत्रिक अडचणी येत असल्याचे डायरेक्ट टॅक्स प्रोफेशनल्स असोसिएशनचे (DPTA) म्हणणे आहे.

New e-filing portal: नव्या टॅक्स पोर्टलमुळे करदाते हैराण; एक-दोन नव्हे तर 40 तांत्रिक अडचणी
पगारावरील कर वाचविण्याचे 10 सोपे मार्ग, बंपर रिटर्नसह मिळेल सेवानिवृत्ती निधी
Follow us on

नवी दिल्ली: केंद्र सरकारने नव्याने सुरु केलेल्या आयकर पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे करदाते प्रचंड हैराण झाले आहेत. या पोर्टलमध्ये थोड्याथोडक्या नव्हे तर ढीगभर तांत्रिक अडचणी येत असल्याचे डायरेक्ट टॅक्स प्रोफेशनल्स असोसिएशनचे (DPTA) म्हणणे आहे. ‘डीपीटीए’ने यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहले आहे. या पत्रात डीपीटीएने नव्या टॅक्स पोर्टलमध्ये (Income Tax Portal) तब्बल 40 समस्या असल्याचे म्हटले आहे. (DPTA complaint to Finance Minister about New e-filing portal)

त्यामुळे कर भरण्याची आणि इतर संबंधित गोष्टी सादर करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणीही DPTA कडून अर्थमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाचे अधिकारी येत्या 22 जूनला इन्फोसिस कंपनीशी संवाद साधणार आहेत. या बैठकीला काही करदाते, लेखापरीक्षकांची शीर्षस्थ संस्था ICAI, ऑडिटर्स आणि काही सल्लागार उपस्थित असतील. यावेळी इन्फोसिसचे अधिकारी त्यांच्या शंकांचे निरसन करतील.

निर्मला सीतारामन यांचा संताप

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवीन पोर्टल डाऊन झाल्याबद्दल संताप व्यक्त करत इन्फोसिसला जाब विचारला आहे. बहुप्रतिक्षित ई-फायलिंग पोर्टल 2.0 सोमवारी रात्री 20.45 वाजता लाँच केलं आहे. नव्या पोर्टलबद्दल अनेक अडचणी समरो आल्या आहेत. इन्फोसिस आणि नंदन निलेकणी तुमच्याकडून दिली जाणारी सेवा गुणवत्तापूर्ण असेल. तुम्ही आमच्या करदात्यांना निराश करणार नाही, अशी आशा देखील सीतारमण यांनी व्यक्त केली.

तसेच या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्रालयाने या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले आहे. येत्या 22 तारखेला दिल्लीत ही बैठक पार पडेल. या बैठकीला काही करदाते, लेखापरीक्षकांची शीर्षस्थ संस्था ICAI, ऑडिटर्स आणि काही सल्लागार उपस्थित असतील. यावेळी इन्फोसिसचे अधिकारी त्यांच्या शंकांचे निरसन करतील.

इन्फोसिस कंपनीला देण्यात आले होते प्रोजेक्ट

मोदी सरकारने ई-फायलिंग पोर्टल तयार करण्याची जबाबदारी इन्फोसिस कंपनीकडे सोपवली होती. इन्कम टॅक्स रिटर्नच्या प्रक्रियेतील सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी 63 दिवसांचा अवधी लागतो. ही प्रक्रिया एका दिवसात पार पाडण्यासाठी इन्फोसिसला या पोर्टलची जबाबदारी देण्यात आली होती.

7 जूनला सुरु झाले होते पोर्टल

www.incometax.gov.in हे पोर्टल 7 जूनपासून सुरु झाले होते. कर भरतानाची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले होते. मात्र, या नव्या पोर्टलचा वापर करताना करदात्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. या पोर्टलवरील अनेक सुविधा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. त्याठिकाणी केवळ COMING SOON असा मेसेज दाखवला जात आहे.

संबंधित बातम्या:

Income Tax Portal: इन्फोसिसने तयार केलेल्या नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी; अर्थमंत्रालयाने बोलावली बैठक

इन्कम टॅक्स विभागाचं नव पोर्टल पहिल्या दिवशी डाऊन, निर्मला सीतारमण यांनी इन्फोसिसला विचारला जाब

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताय, करसवलत मिळवण्यासाठी काय करायचं? वाचा सविस्तर

(DPTA complaint to Finance Minister about New e-filing portal)