September Alert | 1 सप्टेंबरपासून बदलाचे वारे, शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार परिणाम

September Alert | 1 सप्टेंबरपासून या क्षेत्रात बदलाचे वारे आहेत. पीएम किसान योजनेसंबंधीतील कामे करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. नाहीतर तुमची रक्कम अडकू शकते. तर गॅस दरवाढीचा निर्णय प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला होतो.

September Alert | 1 सप्टेंबरपासून बदलाचे वारे, शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार परिणाम
हे होतील बदलImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 1:19 PM

September Alert | अवघ्या दोन दिवसानंतर नवीन महिन्याची अर्थात सप्टेंबर महिन्याची (September Month) सुरुवात होत आहे. ‘खुश है जमाना आज पहिली तारीख है’, असं आपण कित्येकदा ऐकतो, तर पगारदार(Salaried), शेतकरी (Farmer) आणि सर्वसामान्यांच्या (Common Man) आयुष्यात 1 सप्टेंबरपासून कही खुशी कही गमचे वातावरण राहिल. घरगुती गॅसच्या दरवाढीचा निर्णय प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला घेण्यात येतो. काही बँकांचे नियम (Banking Rules) बदलणार आहेत. पीएम किसान योजनेतील (PM Kisan Scheme) शेतकऱ्यांसाठी तर उद्याचा दिवस महत्वाचा आहे. योजनेसंबंधीतील कामे करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. नाहीतर तुमची रक्कम अडकू शकते.  एवढेच नाहीतर सप्टेंबर महिन्यांत सणांमुळे काही दिवस बँका बंद राहणार आहेत. याकाळात तुम्ही बँकेसंबधीचे कामकाज करु शकणार नाही.  त्यामुळे तुमच्याशी संबंधीत काही क्षेत्रात बदल होत असेल तर तो लक्षात घ्या आणि ते काम त्वरीत उरकून घ्या.

PNB KYC Updates

पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांसाठी केवायसी (Know Your Customers) अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे. बँकेने यासंबंधीचे कडक धोरण यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार, ग्राहकांना पुरेसा अवधी देण्यात आला आहे. 31 ऑगस्टपूर्वी ग्राहकांनी त्यांचे केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. बँकेने ट्विट करुन याविषयीची सूचना ग्राहकांना दिली आहे. तसेच ग्राहकांना एसएमएसही पाठवला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही प्रक्रिया राबवण्यात येईल. केवायसी अद्ययावत न करणाऱ्या ग्राहकांना निश्चित कालावधीनंतर खात्यातील व्यवहार करता येणार नाही.

घरगुती गॅसेच्या किंमती

दर महिन्याच्या 1 तारखेला पेट्रोलियम कंपन्या घरगुती गॅसच्या किंमतीत बदल करतात. सातत्याने दरवाढ सुरु असल्याने घरगुती गॅसचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांच्या खिश्याला फटका बसू शकतो. तुमचा गॅस संपण्याच्या तयारीत असेल तर आजच जून्या दराने गॅस बुकींग करा.

हे सुद्धा वाचा

पीएम किसान योजना

प्रधानमंत्री किसान योजनेत निधी प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना e-KYC करण्यासाठी शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 निश्चित केली आहे. जर 31 ऑगस्टपर्यंत या अटीची पूर्तता केली नाही तर शेतकऱ्यांची पुढील हप्ता अटकू शकतो.

विमा एजंटचे कमीशन कमी

IRDAI ने जनरल इन्शुरन्समधील नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार, एजंटच्या कमीशनमध्ये कपात करण्यात आली आहे. आता 30 ते 35 टक्क्यांऐवजी एजंटला 20 टक्के कमिशन मिळणार आहे. परिणामी ग्राहकांना आता विमा स्वस्त मिळेल आणि या व्यवसायाची व्याप्ती ही वाढेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.