नवीन वर्ष, ख्रिसमसला मिळणाऱ्या भेटवस्तूंवर टॅक्स लागतो? जाणून घ्या काय सांगतो कायदा

ख्रिसमसचा उत्सव आणि नव वर्षाचे सेलिब्रेशन जवळ आले आहे. हे दोनही तसे मोठे उत्सव  मानले जातात. ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने आपण पाहुण्यांना किंवा मित्रांना काही गिफ्ट देत असतो, तर काही जण आपल्याला देखील गिफ्ट देत असतात. जाणून घ्या नेमक्या कोणत्या गिफ्टवर कर आकारला जातो.

नवीन वर्ष, ख्रिसमसला मिळणाऱ्या भेटवस्तूंवर टॅक्स लागतो? जाणून घ्या काय सांगतो कायदा
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 6:15 AM

नवी दिल्ली : Income Tax on Gifts ख्रिसमसचा उत्सव आणि नव वर्षाचे सेलिब्रेशन जवळ आले आहे. हे दोनही तसे मोठे उत्सव  मानले जातात. ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने आपण पाहुण्यांना किंवा मित्रांना काही गिफ्ट देत असतो, तर काही जण आपल्याला देखील गिफ्ट देत असतात. परंतु असे देखील काही गिफ्ट असतात ज्यावर आपल्याकडून इनकम टॅक्स आकारला जाऊ शकतो. गिफ्ट देण्या-घेण्याच्या बाबतीमध्ये इनकम टॅक्सचा नियम काय सांगतो? कोणत्या गिफ्टवर टॅक्स आकारला जाऊ शकतो हेच आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत.

‘या’ गिफ्टवर नाही आकारला जात कर

असे काही गिफ्ट असतात ज्यावर टॅक्स आकारला जात नाही, मग त्याची किंमत कितीही असो ते टॅक्स फ्री असतात. त्यामध्ये पुढील गिफ्टचा समावेश होतो. नातेवाईकांकडून मिळालेल्या गिफ्टवर टॅक्स आकारला जात नाही, अशा नातेवाईकांमध्ये बायको आणि आई -वडिलांचा समावेश होतो. तसेच तुमच्या लग्नवेळी देण्यात येणाऱ्या गिफ्टवर देखील कोणताही टॅक्स लागत नाही. तुम्हाला जर एखादे गिफ्ट हे वारसहक्काने मिळणार असेल तर ते देखील टॅक्स फ्री असते. एखाद्या व्यक्तीला आपल्या मृत्यूची कल्पना आली असेल आणि त्याची जर एखाद्या व्यक्तीला गिफ्ट देण्याची इच्छा असेल तर त्याच्यावर देखील टॅक्स आकारला जात नाही.

या गिफ्टवर लागू  शकतो कर 

जर तुम्हाला एका वित्त वर्षामध्ये कोणी पन्नास हजारांपेक्षा अधिक रक्कम गिफ्ट म्हणून दिल्यास त्या रकमेवर कर लागतो. कोणी एखादे घर,जागा किंवा संपत्ती गिफ्ट दिल्यास त्यावर देखील कर आकारला जातो. तसेच सर्व मौल्यवान धातू  आणि शेअर ज्यांची किंमत ही पन्नास हजारांपेक्षा जास्त आहे, अशा सर्व गोष्टींवर कर आकारला जातो.

संबंधित बातम्या

ईपीएफओकडून 23.44 कोटी खात्यांवर व्याज जमा; ‘असे’ चेक करा आपले बॅलन्स

एफडी ही फायद्याची, जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळेल सर्वोत्तम परतावा

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, दहा वर्षात मिळवा डबल

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.