वाहनांसाठी पेट्रोल-डिझेलची गरज लागणार नाही, 60 ते 62 रुपयांत मिळणार ‘हे’ इंधन, वाचा नितीन गडकरींचा प्लॅन

Flex Fuel | भारतीय वाहन उद्योग क्षेत्राची उलाढाल पुढील 15 वर्षात 15 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. सर्व वाहन उत्पादकांसाठी फ्लेक्स-इंधन इंजिन अनिवार्य केल्यानंतर वाहनांची किंमत वाढणार नाही, असा दावा गडकरी यांनी केला.

वाहनांसाठी पेट्रोल-डिझेलची गरज लागणार नाही, 60 ते 62 रुपयांत मिळणार 'हे' इंधन, वाचा नितीन गडकरींचा प्लॅन
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 1:02 PM

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सामान्य जनतेचे आर्थिक गणित कोलमडत आहे. इंधनाच्या दरांनी सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आता सरकार कोणत्याही प्रकारे पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, सरकार सर्व वाहन उत्पादकांना पुढील सहा-आठ महिन्यांत युरो-सहा उत्सर्जन नियमांनुसार फ्लेक्स-इंधन इंजिन बनवण्यास सांगेल.

फ्लेक्स-इंधन पेट्रोल आणि मेथनॉल किंवा इथेनॉलच्या संयोगातून बनवलेले पर्यायी इंधन आहे. भारतीय वाहन उद्योग क्षेत्राची उलाढाल पुढील 15 वर्षात 15 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. सर्व वाहन उत्पादकांसाठी फ्लेक्स-इंधन इंजिन अनिवार्य केल्यानंतर वाहनांची किंमत वाढणार नाही, असा दावा गडकरी यांनी केला.

फ्लेक्स-फ्यूएल इंजिनमुळे काय होणार?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, मी एक आदेश जारी करणार आहे. त्यानुसार देशातील वाहनांमध्ये केवळ पेट्रोल इंजिन नव्हे तर फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असेल. त्यामुळे लोकांना इंधन म्हणून 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येईल.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार?

इंधनाच्या दरवाढीमुळे सध्या देशातील नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. मात्र, दिवाळीच्या काळात मोदी सरकारकडून याबाबत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिवाळीच्या काळात इंधनाच्या दरात कपात केली जाऊ शकते. मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे. तसे घडल्यास इंधनाच्या किंमतीत किमान दोन ते तीन रुपयांनी घट होऊ शकते.

जानेवारी महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 35 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून इंधन दरकपात करुन नागरिकांना दिलासा दिला जाऊ शकतो.

कोणत्या देशात वापरले जाते फ्लेक्स-फ्यूएल इंजिन?

सध्याच्या घडीला ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स-फ्यूएल इंजिनाची निर्मिती केली जाते. त्यामुळे वाहनचालकांना 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के बायो-इथेनॉल वापरण्याचा पर्याय उपलब्ध होतो.

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा समावेश

केंद्र सरकारने येत्या दोन वर्षात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेडिंगचे लक्ष्य ठेवले आहे. जेणेकरून भारताला खनिज तेलाची आयात कमीप्रमाणात करावी लागेल. 2015 मध्ये पेट्रोलमध्ये एक ते दीड टक्के इथेनॉलची मात्रा होती. सध्या हे प्रमाण 8.5 टक्के इतके आहे. पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणामुळे इंधनाची गुणवत्ता सुधारते. तसेच उत्पादनासाठी कमी खर्च लागत असून प्रदूषणही कमी होते, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

इतर बातम्या:

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.