घरावर सौर पॅनल बसवतायेत?, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
दिवसेंदिवस विजेचे दर वाढत आहेत. तसेच पूर्ण दिवसभर वीजपुरवठा होईलच याची खात्री देखील नसते. त्यामुळे आता अनेक जणांनी सौर ऊर्जेपासून वीज निर्मितीला सुरूवात केली आहे. यासाठी घरावर सोलर पॅनल बसवण्यात येते. सुरुवातील ही प्रक्रिया थोडीशी खर्चीक आहे, मात्र त्यानंतर आपल्याला लाईफटाईम पूर्णपणे मोफत वीज मिळते.
मुंबई : दिवसेंदिवस विजेचे दर वाढत आहेत. तसेच पूर्ण दिवसभर वीजपुरवठा होईलच याची खात्री देखील नसते. त्यामुळे आता अनेक जणांनी सौर ऊर्जेपासून वीज निर्मितीला सुरूवात केली आहे. यासाठी घरावर सोलर पॅनल बसवण्यात येते. सुरुवातील ही प्रक्रिया थोडीशी खर्चीक आहे, मात्र त्यानंतर आपल्याला लाईफटाईम पूर्णपणे मोफत वीज मिळते. तसेच पावसाळी हवामानाचा अपवाद वगळता घरात चोवीस तास वीज उपलब्ध असते. या विजेचा उपयोग आपण विविध कारणांसाठी करू शकतो. मात्र तुम्हाला जेव्हा घरावर सौर पॅनल बसवायचे असते तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.
‘या’ गोष्टींची घ्या काळजी
तुम्ही सौर पॅनल बसवण्यासाठी जेव्हा डीलरशी संपर्क साधता, तेव्हा तो आपल्याला सौर पॅनल बसवण्यासाठी सरकारने अधिकृतरित्या नियुक्त केल्याचे सांगतो. मात्र इथे थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण असा कोणताही अधिकृत डीलर नियुक्त करण्यात आला नसल्याची माहिती खुद्द नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीनेच देण्यात आली आहे. तसेच सौर पॅनल बसवण्यासाठी सरकारने जेवढी किंमत निर्धारित केली आहे, तेवढीच देण्यात यावी असे आवाहन देखील मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
सरकारकडून मिळते अनुदान
देशात विजेच्या निर्मितीसाठी अन्य पर्याय म्हणून आता अनेक जण सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या अंपारपरीक साधनांकडे वळू लागले आहेत. मात्र अद्यापही आपण वीजेच्या निर्मीतीसाठी मोठ्याप्रमाणात कोळशावरच अवलंबून आहोत. आपल्या घरात येणारी वीज कोळशाचा उपयोग करून बनवण्यात येते. वीजेच्या निर्मितीसाठी तसेच अन्य कारणासाठी आपल्याला मोठ्याप्रमाणात कोळसा विदेशातून आयात करावा लागतो. ही प्रक्रिया अत्यंत खर्चिक असते. तसेच कोळशापासून वीज निर्माण करताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील होते. त्यामुळे कोळशावरील विजेचे अवलंबित्व कमी व्हावे, प्रदूषणाला आळा बसावा यासाठी आता केंद्रकडून प्रयत्न केले जात आहेत. सौर ऊर्जेचा वापर वाढल्यास इतर वीजेचा वापर कमी होऊ शकतो, म्हणून आता केंद्राकडून सौर पॅनलच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
महिन्याभरात 21 पटीने वाढले कॉफीचे दर; जाणून घ्या काय आहेत भाव वाढीमागील कारणे?
गुड न्यूज! पुढील वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 9 टक्के राहण्याचा अंदाज