UPI Cash Withdrawal : डेबिट कार्डची नाही आता गरज, एटीएममधून पैसा काढा UPI मार्फत

UPI Cash Withdrawal : आता एटीएममध्ये पैसे काढायला गेला तर डेबिट कार्ड नेण्याची गरज नाही. तुम्हाला मोबाईलमधील युपीआय ॲपचा वापर करुन सहज पैसे काढता येतील, कोणत्या बँकेने ही सुविधा सुरु केली आहे?

UPI Cash Withdrawal : डेबिट कार्डची नाही आता गरज, एटीएममधून पैसा काढा UPI मार्फत
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 4:20 PM

नवी दिल्ली : आता एटीएममधून (ATM) पैसे काढण्यासाठी तुम्हाला खिशात एटीएम कार्ड घेऊन फिरण्याची गरज नाही. तुम्ही युपीआयच्या मार्फत एटीएममधून पैसे काढू शकता. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेने ही सुविधा सुरु केली आहे. कोणत्याही ग्राहकाला बँकेच्या एटीएममधून युपीआयचा वापर करुन जलद रोख रक्कम प्राप्त करता येईल. अशी सुविधा देणारी ही भारतातील पहिली सरकारी बँक ठरली आहे. ग्राहकांना भीम युपीआय वा मोबाईलमधील युपीआय ॲपचा (UPI App) वापर करुन सहज पैसे काढता येतील. एटीएमवर ग्राहक एका दिवसात दोनदा व्यवहार करु शकतो. एकावेळी जास्तीत जास्त 5,000 रुपये रोख काढता येतील. म्हणजे एका दिवसात 10 हजार रुपये रोख रक्कम त्याला काढता येईल. कोणत्या बँकेने ही सुविधा सुरु केली आहे?

या बँकेने सुरु केली सुविधा सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) इंटरऑपेबल कार्डलेस कॅश विड्रॉल (ICCW) मार्फथ ही सुविधा सुरु केली आहे. या सुविधेमार्फत कोणताही ग्राहक त्याच्या मोबाईलमधील युपीआय ॲपचा (UPI App) वापर करुन रोख रक्कम मिळवू शकतो. आयसीसीडब्ल्यू सुविधेचा लाभ घेऊन बँक ऑफ बडोद्याच्या एटीएममधून त्याला पैसे काढता येतील. त्यासाठी ग्राहकांना एटीएम कार्डचा उपयोग करण्याची गरज नाही.

किती काढता येईल रक्कम बोओबीच्या एटीएमवर ग्राहक एका दिवसात दोनदा व्यवहार करु शकतो. एकावेळी जास्तीत जास्त 5,000 रुपये रोख काढता येतील. म्हणजे एका दिवसात 10 हजार रुपये रोख रक्कम त्याला काढता येईल. बँकेचे मुख्य डिजिटल अधिकारी अखिल हांडा यांनी सुविधेची माहिती दिली. ग्राहकांना आता एटीएमचा वापर न करता रक्कम काढता येईल. देशभरात बँक ऑफ बडोद्याचे 11,000 हून अधिक एटीएम आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकांना क्लोनिंग, स्किमिंग आणि डिव्हाईस हॅकिंगसारख्या प्रकारांना आळा घालून एटीएमसाठी ICCW पर्याय उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

एटीएममधून अशी काढा रोख या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना बँक ऑफ बडोद्याच्या एटीएमवर ‘युपीआय रोख रक्कम काढणे’ हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर जितकी रक्कम काढायची, तिचा आकडा नोंदवावा लागेल. त्याचवेळी एटीएमच्या स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसेल. त्या कोडला आयसीसीडब्ल्यू अधिकृत युपीआई ॲपचा वापर करुन स्कॅन करावा लागेल. त्यानंतर व्यवहार अधिकृतपणे पूर्ण करावा लागेल. त्यानंतर तुमचा पैसा एटीएममधून काढता येईल. अनेक बँकांनी यापूर्वीच कार्डलेस विड्रॉलची सुविधा सुरु केली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.