‘या’ सरकारी बँकेने कर्जदारांना दिली मोठी खूशखबर; 30 सप्टेंबरपर्यंत शुल्काचा एक रुपयाही भरावा लागणार नाही

गृहकर्ज 6.90 टक्के व्याज दराने घेता येईल. त्याचबरोबर वाहन कर्जाचो व्याजदर 7.30 टक्के निश्चित करण्यात आला आहे. तसेच सुवर्ण कर्ज योजनेतही बदल करण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. 20 लाख रुपयांपर्यंतच्या सुवर्ण कर्जाचा व्याजदर 7.10 टक्के आहे.

‘या’ सरकारी बँकेने कर्जदारांना दिली मोठी खूशखबर; 30 सप्टेंबरपर्यंत शुल्काचा एक रुपयाही भरावा लागणार नाही
‘या’ सरकारी बँकेने कर्जदारांना दिली मोठी खूशखबर
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 9:02 PM

नवी दिल्ली : सणासुदीपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या ग्राहकांना मोठी खूशखबर दिली आहे. बँकेने सोने, गृहनिर्माण, कार आणि सुवर्ण कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. यामुळे तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत. (Not a single rupee will have to be paid till September 30 in this bank)

बँकेने प्रोसेसिंग फी घेणे रद्द केले

जेव्हा तुम्ही कर्ज घेता, तेव्हा त्या कर्जाशी संबंधित अनेक बाबी तुम्हाला आधी कराव्या लागतात. त्यामुळे मोठ्या खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागतो. यात इतर गोष्टींबरोबरच व्याज, प्रक्रिया शुल्क, प्रशासकीय शुल्क, प्रीपेमेंट दंड यांचा समावेश असतो. मात्र काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सणासुदीच्या काळात ग्राहकांना अधिक लाभ देण्यासाठी बँकेने प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. ही ऑफर 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू असेल.

तुम्हाला या व्याजदराने बँक कर्ज मिळेल

बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गृहकर्ज 6.90 टक्के व्याज दराने घेता येईल. त्याचबरोबर वाहन कर्जाचो व्याजदर 7.30 टक्के निश्चित करण्यात आला आहे. तसेच सुवर्ण कर्ज योजनेतही बदल करण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. 20 लाख रुपयांपर्यंतच्या सुवर्ण कर्जाचा व्याजदर 7.10 टक्के आहे. त्याचबरोबर 1 लाख रुपयांपर्यंतच्या सुवर्ण कर्जासाठी प्रक्रिया शुल्क शून्यावर आणण्यात आले आहे.

या ऑफर मिळवा

बँकेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे सांगण्यात आले आहे की, गृहकर्जाचे नियमित ईएमआय भरणाऱ्यांना दोन ईएमआय माफ केले जाणार आहेत. या व्यतिरिक्त कर्ज मधेच बंद करण्यासाठीही शुल्क भरावे लागणार नाही. जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी 5 लाख रुपयांचे वाहन कर्ज घेतले असेल आणि आता तुम्हाला कर्ज देणाऱ्या बँकेला एक लाख रुपयांची एकरकमी रक्कम देऊन तुमच्या कर्जाचा कालावधी किंवा मासिक हप्त्याची रक्कम कमी करायची असेल तर त्याला प्रीपेमेंट म्हणतात. विहित कालावधीत कर्ज बंद करण्यासाठी किंवा परतफेड करण्याच्या प्रक्रियेत तुम्ही कर्जार्ची संपूर्ण थकीत रक्कम बँकेला परत करायची असते. (Not a single rupee will have to be paid till September 30 in this bank)

इतर बातम्या

बिल्डरने खोदलेल्या खड्ड्यात पोहोण्यासाठी मुलांची उडी, पाण्याचा अंदाज न आल्याने अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू

मोठी बातमी ! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात 40 अतिरिक्त विशेष ट्रेन, रेल्वे विभागाचा निर्णय

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.